(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मल्याळम चित्रपट उद्योगाचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांना कसे वाटले हे अभिनेत्याने व्यक्त केले आहे. अभिनेते मोहनलाल या आनंदाबद्दल नक्की काय म्हणाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
हा पुरस्कार संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टीचा आहे
रविवारी माध्यमांशी बोलताना, भारतातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेले मोहनलाल म्हणाले की, हा पुरस्कार केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टीचा आहे असे त्यांना वाटते. त्यांनी या सन्मानाबद्दल माहिती देण्यात आल्याचा क्षण देखील आठवला, ज्याचे वर्णन त्यांनी “एक अद्भुत स्वप्न” असे केले आहे. त्यांना या पुरस्काराबद्दल खूप आनंद झाला आहे. आणि त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर मांडले मत, म्हणाली ‘पोलिसांनाही गंडवलं…’
अभिनेत्याने हा पुरस्कार सर्वांसोबत वाटून घेतला. मोहनलाल म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीत मल्याळम चित्रपटाला पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे. मी देवासाठी काम करतो. म्हणूनच मी म्हणतो की हा पुरस्कार देवाने दिला आहे. आम्ही आपल्या कामात प्रामाणिकपणा देखील दाखवतो. मी हा पुरस्कार सर्वांसोबत वाटून घेतो आणि जे आता या जगात नाहीत त्यांना आठवतो.”
मोहनलाल यांना सुरुवातीला विश्वास बसला नाही
मोहनलाल म्हणाले, “पंतप्रधान कार्यालयातून फोन आला तेव्हा मला सुरुवातीला विश्वास बसला नाही. मला वाटले की ते फक्त एक स्वप्न आहे. म्हणून मी त्यांना पुन्हा ते समजावून सांगण्यास सांगितले. चित्रपटाला सीमा नसतात. जर मला दिग्दर्शन करायचे असेल तर मी करेन. मी इतर अनेक गोष्टी करेन. जर तुम्ही मला विचारले की चित्रपटाबाहेर माझे स्वप्न काय आहे, तर मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. मी खूप कमी स्वप्ने पाहणारा माणूस आहे. मला चांगले चित्रपट बनवायचे आहेत. चांगले लेखक आणि चांगले दिग्दर्शक असले पाहिजेत.”
आधी कधीही न पाहिलेला शाहरुख, अभिषेकचा लुक समोर… किंग सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक
मोहनलाल यांच्याबद्दल
चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, मोहनलालने विविध शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जणार आहे.