(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ने नुकतीच ‘किंग’ चित्रपटाच्या एका शानदार लूकची झलक दिली आहे. त्याच्या या लुकने चाहत्यांना थक्क करून टाकले आहे, आणि सोशल मीडियावर त्याच्या स्टाईलची चर्चा जोरात सुरू आहे.याच सोबत शाहरुख, सुहाना खान आणि अभिषेक बच्चन याचा ‘किंग’ चित्रपटातला पहिला लुक देखील समोर आलेला आहे.
शाहरुख खान हा आर्यन खानच्या डायरेक्टोरियल डेब्यू ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ मुळे आधीच चर्चेत होता, आणि आता तो स्वतःच ‘किंग’ चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेचा विषय बनला आहे. दीपिका पादुकोणने ‘किंग’ चित्रपटाची घोषणा केली आणि त्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
🚨 #SRKians Alert !!🚨
We’re creating an Active Retweet Gc for #KING Movie ✨
Only for active & loyal #SRK fans who want to Support,Hype & trend together.
To be added, comment your ids under this tweet.💯👍🏻
Let’s unite & make #KING roar louder than ever 👑#ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/fcpHLpFeC2
— Arshad (@KingKing1862968) September 20, 2025
या फोटोत शाहरूख खानने सफेट स्टायलिश शर्ट आणि कॅप घातली आहे. शाहरूखच्या दाढीचा लूक आणि त्याने काढलेल्या टॅटूने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Latest look of Abhishek Bacchan with new hairstyle for #King pic.twitter.com/Yl5SsVKYWP
— SRK Fans United (@SRKUnited_) September 20, 2025
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर मांडले मत, म्हणाली ‘पोलिसांनाही गंडवलं…’
शाहरूख खानच्या किंग या चित्रपटात बॉलिवूडच्या कलाकरांची मोठी फौज असणार आहे. किंग या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे करणार आहेत. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे झळकणार असून, यामध्ये दीपिका पादुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जैकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अरशद वारसी, राघव जुयाल, आणि सौरभ शुक्ला यांचा समावेश आहे.शाहरूख खान सोबत सुहाना खान देखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे तिच्या करिअरसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. हा बहुप्रतीक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच २०२६ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.