(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘जटाधारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच दक्षिणात्य अभिनेता सुधीर बाबूसोबत झळकणार असून, या दोघांची ही पहिली जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, त्यामध्ये थरारक आणि अंगावर शहारे आणणारे दृश्ये पाहायला मिळत आहेत.या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ‘धन पिशाचिनी’ या अतिशय वेगळ्या आणि गूढ भूमिकेत दिसणार आहे. तिचा लुक देखील तितकाच आकर्षक आणि धडकी भरवणारा आहे. डोक्यावर मुकुट, भरगच्च सोनेरी दागिने आणि तीव्र नजर असलेली सोनाक्षी एक वेगळाच अनुभव देणारी आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान सोनाक्षी म्हणाली, “मला इंडस्ट्रीत येऊन १५ वर्षं झाली, आणि आता मी ‘जटाधारा’मधून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, याचा खूप आनंद आहे.” तिने पुढे सांगितलं की,”हा रोल माझ्यासाठी खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. पण अशा भूमिका मला खूप आवडतात, ज्या मला अभिनयाची नवी दिशा देतात.” मला अभिमान आहे की ‘जटाधारा’ माझा पहिला तेलुगू चित्रपट आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे.”
२०२५ चा सर्वात मोठा अॅक्शन मसाला चित्रपट; एजंट चिंग्स’ट्रेलरने चाहत्यांना घातली भुरळ !
‘जटाधारा’ या तेलुगू चित्रपटात सोनाक्षी सिन्हा एका हटके आणि भयावह भूमिकेत दिसणार आहे. धन पिशाचिनीच्या रूपात! या नव्या आणि धाडसी भूमिकेबद्दल बोलताना सोनाक्षीनं तिचं मनोगत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, ”जेव्हा फिल्म रिलीज होईल, तेव्हा तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल. मी माझ्या आयुष्यात असं पात्र कधीच साकारलं नव्हतं.”
धन पिशाचिनी या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे ती जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या खजिन्याची राखण करणारी अतीशय शक्तिशाली स्त्री आहे.ट्रेलरमध्ये पाहायला मिळणारा सोनाक्षीचा लुक पूर्णपणे देवी दुर्गेच्या तेजस्वी रूपाशी मिळता जुळता आहे.तिच्या डोक्यावर भव्य मुकुट, अंगभर जड सोनेरी दागिने, आणि चेहऱ्यावर एक रहस्यमय, रौद्र भाव – हे सर्व तिला देवीसारखं भासवतं.मात्र तिचं नाव ठेवलं आहे ‘धन पिशाचिनी’, जे एका प्रकारे देवी आणि राक्षसी स्वरूपाचं मिश्रण आहे.