(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
2023 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळण्यात आले. परंतु आता सूरज पांचोलीची आई जरीना वहाब दुःखात आहे. आपल्या मुलाच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला, याविषयी या स्पष्ट बोलल्या आहेत. अभिनेत्री जरीना वहाब काय म्हणाल्या जाणून घेऊयात.
‘जियाने 4-5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला’
‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत जरीना वहाबने जिया खान आत्महत्या प्रकरणाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘सूरजला भेटण्यापूर्वीही तिने 4-5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण नशिबाने माझ्या मुलाची वेळ आणली आणि तेव्हा हे सर्व घडले.’ असे झरिना म्हणाल्या, पुढे त्यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्वांनी खूप कठीण प्रसंगांचा सामना केला, पण मला एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खोटे बोलून एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले तर ते कर्जासारखे आहे, जे एक दिवस व्याजासह परत मिळते.’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
जियाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री जरीना?
जियाबद्दल पुढे बोलताना अभिनेत्री जरीना यांनी सांगितले की, ‘कर्म हेच म्हणते. आम्ही वाट पाहिली कारण तो निर्दोष होता आणि त्याला 10 वर्षे लागली. पण आता तो यातून बाहेर आला आहे आणि मी आनंदी आहे. या प्रकरणाचा सूरजच्या करिअरवर वाईट परिणाम झाला आहे. ती काय करायची हे सगळ्यांना माहीत आहे. मला याबद्दल जास्त बोलायचे नाही कारण मला स्वतःला कमी लेखायचे नाही.’ असे त्यांनी सांगितले.
सूरज पांचोलीला तुरुंगात टाकले
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. जियाच्या आईला तिचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरात सापडला. त्यानंतर तिचा प्रियकर सूरज पांचोलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सूरज 22 दिवस तुरुंगात राहिला. 10 वर्षांच्या लढाईनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. आणि आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्याची आई जरीना वहाबने आपले स्पष्ट मत मांडले आहे.
काय आहे जिया खानचे संपूर्ण प्रकरण?
जून 2013 मध्ये जिया खानने तिच्या घरात गळफास लावून घेतला होता. जियाचा मृत्यू झाला तेव्हा तिचे सूरज पांचोलीसोबत प्रेमसंबंध होते. जियाच्या मृत्यूनंतर जियाच्या आईने सूरज आणि त्याच्या कुटुंबावर आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्याला अटकही झाली पण नंतर जामिनावर सुटका झाली. जियाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात निशब्द या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात ती अमिताभ बच्चनसोबत दिसली होती. यानंतर तिला आमिर खानसोबत यशस्वी ॲक्शन थ्रिलर ‘गजनी’मध्ये काम करण्याची संधी मिळाली.