करीना कपूरचे चुलत भाऊ आधार जैन आणि आलेखा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी दोघांचा उत्तर भारतीय परंपरेनुसार रोका सेरेमनी पार पडला, ज्यामध्ये कपूर कुटुंबीय खूप मस्ती करताना दिसले. एकीकडे करीना कपूर निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती, तर दुसरीकडे रणबीरही आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसला. आता या रोका सोहळ्याची अनसीन फोटो समोर आली आहेत, ज्यात कपूर कुटूंब आनंदी दिसत आहे.
करीना कपूरचा चुलत भाऊ आधार जैन आणि आलेखा अडवाणी लवकरच विवाहबंधनात अडकणार (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये रणबीर कपूर त्याची भावी वहिनी आलेखाला टिळा लावताना दिसत आहे. फोटोमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये रणबीर खूपच हँडसम दिसत आहे. त्याचा हा डॅशिंग लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.
या चित्रात आलेखाची भावी सासू रीमा कपूर आपल्या सुनेला टिळा लावताना दिसत आहे. आधार जैन आणि आलेखा यांच्या रोका समारंभाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
या चित्रात करिश्मा कपूर आलेखाला तिलक लावत आहे आणि तिची आरती करत आहे. करीना आणि करिश्मा लवकरच नणंद होणार आहेत. या दोघंही या सोहळ्यात खूप सुंदर दिसत होत्या.
या छायाचित्रात आधार जैन त्याच्या धाकट्या भावासोबत फोटो काढत आहे. फोटोत हे दोघे भाऊ खूपच हँडसम दिसत आहेत.
या फोटोमध्ये आधार त्याच्या चुलत भावंडांसोबत सेल्फी घेत आहे. फोटोमध्ये करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि नव्या नंदा देखील दिसत आहेत.
या फोटोमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब आणि जैन कुटुंब स्पष्टपणे झळकत आहे. या फोटोमध्ये करिनापासून ते सैफ अली खान आणि करिश्मा कपूरही दिसत आहेत.