
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए.आर. रहमान सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी “छावा” चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की या चित्रपटाने समाजात फूट पाडणारे वातावरण निर्माण केले आहे. ए.आर. रहमान यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि काही लोक त्यावरून नाराज देखील झाले आहेत. आता, यावर बॉलीवूड अभिनेत्री आणि मंडीच्या खासदार कंगना रणौत यांनी ए.आर. रहमान यांना फटकारले आहे. कंगनाने काय म्हटले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
कंगना रणौत काय म्हणाली?
ए.आर. रहमान यांनी छावाबद्दल वादग्रस्त विधान करताच त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. कंगना रणौतने आता इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये ए.आर. रहमान यांच्यावर टीका करताना दिसली आहे. तिने बॉलीवूडमध्ये पक्षपातीपणा दाखवल्याबद्दल संगीतकारांवरही टीका केली आहे. तिच्या स्टोरीमध्ये तिने लिहिले आहे की, “प्रिय रहमान जी, मी भगव्या पक्षाला पाठिंबा देते म्हणून मला इंडस्ट्रीमध्ये पक्षपात आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. पण मी तुमच्यासारखा पक्षपाती आणि द्वेषपूर्ण माणूस कधीच पाहिला नाही.”
कंगना पुढे म्हणाली, “मला खरोखरच माझ्या दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची कहाणी तुम्हाला सांगायची होती. परंतु तुम्ही ऐकणे सोडा मला भेटण्यास देखील नकार दिलात. विरोधी पक्षांच्या मंत्र्यांनी माझ्या चित्रपटाचे कौतुक केले केले, तुम्हाला प्रचार चित्रपटाचा भाग व्हायचे नाही असे मला सांगण्यात आले. आणि कोणीही माझ्या चित्रपटाला प्रचार म्हटले नाही. पण तुम्ही तुमच्या द्वेषात आंधळे झाला आहात आणि मला तुमच्याबद्दल आता खूप वाईट वाटत आहेत.”
यापुढे अभिनेत्रीने, “रहमानजी प्रत्येकाची स्वतःची लढाई असते. चित्रपटसृष्टी सोडून दिली, तरी मोठमोठे डिझायनर जे कधी माझे जिवलग मित्र असल्याचे सांगत, मोफत प्रमोशनसाठी त्यांच्या दागिन्या आणि कपड्यांचे लॉन्च माझ्याकडून करून घ्यायचे, त्यांनी नंतर माझ्या स्टायलिस्टला कपडे देण्यास नकार दिला. त्यांनी माझ्याशी बोलणेही बंद केले आणि माझ्याबद्दलच्या पोस्ट करणेही थांबवले. आज रहमानजी मगरीचे अश्रू काढत आहेत, त्यांच्या स्वतःच्या द्वेषाचे आणि पूर्वग्रहांचे काय?”
राजकुमार राव आणि पत्रलेखाने दाखवली छोट्या परीची झलक; गोड मुलीचे नाव देखील केले जाहीर
ए.आर. रहमान पुढील कोणत्या चित्रपटासाठी देणार संगीत?
कंगना रणौतच्या “इमर्जन्सी” चित्रपटानेही बराच वाद निर्माण केला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी चांगली झाली नसली तरी, कलाकारांचे खूप कौतुक झाले. ए.आर. रहमान यांनी “छावा” साठी देखील संगीत दिले होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर ₹८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ए.आर. रहमान आता प्रसिद्ध हॉलिवूड संगीतकार हंस झिमर यांच्यासोबत बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपट “रामायण” साठी संगीत देणार आहेत.