(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत विक्रमी कमाई केली आहे. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. तीन दिवसांतच हा चित्रपट १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. तसेच हा चित्रपट पुढे आणखी कमाई करताना दिसणार आहे.
या चित्रपटाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन
सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे तो १५० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. परंतु, जर चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५५ कोटींची कमाई केली तर आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन ₹६२.८५ कोटी इतके आहे.
अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र
कंतारा चॅप्टर १ ने पहिल्या दिवशी ६१.८५ कोटींची कमाई केली. चित्रपटाने कन्नड ऑक्यूपेंसीमध्ये १९.६ कोटी, तेलुगूमध्ये १३ कोटी, हिंदीमध्ये १८.५ कोटी आणि मल्याळममध्ये ५.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४६ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने कन्नड ऑक्यूपेंसीमध्ये ₹१३.५ कोटी, तेलुगूमध्ये ₹११.७५ कोटी, हिंदीमध्ये ₹१२.५ कोटी, तमिळमध्ये ₹४.५ कोटी आणि मल्याळममध्ये ₹३.७५ कोटी कमाई केली.
‘कांतारा चॅप्टर १’ ने हे रेकॉर्डस् तयार केले
शुक्रवारी, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला, त्याने सु फ्रॉम सो (₹९२ कोटी) ला मागे टाकले. शनिवारी, त्याने सलमान खान आणि राम चरण सारख्या स्टार्सना मागे टाकले. त्याने सिकंदर (₹११० कोटी) आणि गेम चेंजर (₹१३१ कोटी) चित्रपटाला मागे टाकले. यासह, या चित्रपटाने १५० कोटी क्लबमध्ये प्रवेश करत, असे करणारा चौथा कन्नड चित्रपट ठरला आहे.
चौथ्या आठवड्यातही दमदार ‘दशावतार’! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा २०२२ च्या कांतारा चित्रपटाचा प्रीक्वल आहे. कांतारा हा जगभरात ४०० कोटी कमाई करणारा ऑलटाइम ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. हा चित्रपट फक्त १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला आहे. कांतारा चित्रपटाच्या यशानंतर, कांतारा चॅप्टर १ प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही भूमिका आहेत.