Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चित्रपटात भविष्य नाही” असं म्हणाले होते ‘या’ अभिनेत्रीचे वडील, आता गर्वाने उंचावते मान!

बॉलीवूड स्टार करीना कपूर आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्रींच्या वडिलांना ती चित्रपटात काम करते हे आवडत नसे. परंतु तिच्या मेहनतीमुळे आज ती यशस्वी झाली आहे आणि तिच्या वडिलांना आता त्यांच्या मुलीचा अभिमान वाटत आहे. जाणून घेऊयात करीन कपूर हा मेहनती आणि यशस्वी प्रवास.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 21, 2024 | 10:25 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

करीना कपूर खान ही उत्कृष्ट अभिनेत्रींनपैकी एक आहे. जिने चाहत्यांच्या मन वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते तिला शुभेच्छा देत आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की करिनाच्या वडिलांना तिने चित्रपटात प्रवेश करावा असे वाटत नव्हते? मात्र, आज करीना कपूर खानच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी जाणून घेऊया ज्यांना आता करीन आपली मुलगी असल्याचा अभिमान वाटत आहे.

लहानपणापासूनच अभिनयाची होती आवड
करीना कपूरला लहानपणापासूनच अभिनयाच्या दुनियेत येण्याची इच्छा होती. तिला चित्रपटांची खूप आवड होती आणि ती प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस आणि मीना कुमारी यांच्यापासून प्रेरित होती. मात्र वडील रणधीर कपूर या निर्णयाच्या विरोधात होते. कुटुंबातील महिलांना चित्रपटात काम करता येत नाही, कारण त्याचा परिणाम कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांवर होतो, असे त्यांचे मत होते. तरीही अभिनेत्रीने आपली इच्छा पूर्ण केली. आणि तिने या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

अभिनेत्रींच्या आईने दिली साथ
करीनची आई बबिता यांनी आपल्या मुलीला नेहमीच पाठिंबा दिला. जेव्हा रणधीर कपूरने चित्रपटात काम करण्यास नकार दिला तेव्हा बबिताने करीनाला पूर्ण पाठिंबा दिला. या निर्णयामुळे रणधीर आणि बबिता यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगळे राहू लागले. बबिता यांनी आपल्या मुलींना एकट्याने वाढवले ​​आणि त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या करिअरलाही हातभार लावला. करीना आणि करिश्मा आज जे काही आहेत, ते त्यांच्या आईच्या मेहनतीमुळे आणि पाठिंब्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, आणि याची जाणीव या दोन्ही मुलींना आहे.

अभिनेत्रीने कठोर परिश्रमाने यश मिळवले
अर्थात रणधीर कपूरने सुरुवातीला करिनाला चित्रपटांमध्ये काम करण्यापासून रोखले, पण आपल्या मेहनतीच्या जोरावर करीनाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने ‘जब वी मेट’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले, अभिनेत्रीने तिचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. आता रणधीर कपूरला आपल्या मुलींचा अभिमान वाटतो आणि त्यांची पत्नी बबिता ही खरी मार्गदर्शक होती असा त्यांचा विश्वास आहे.

वडिलांची बदललेली विचारसरणी
आपल्या मुलीची मेहनत आणि यश पाहून करीनाच्या वडिलांनी आता विचार बदलला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘आता मला माझ्या मुलींचा अभिमान आहे आणि त्यांनी स्वत:च्या बळावर यश मिळवले याचा खूप आनंद आहे.” असे अभिनेत्याने सांगितले होते. करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी देखील अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले असून त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट आहेत.

हे देखील वाचा- १०० नव्हे तर ७० दिवसात संपणार बिग बॉस मराठी? सोशल मीडियावर उडाली खळबळ!

आता करीना चित्रपटांमध्ये झळकत आहे
करीना कपूर खान आजही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ती सतत मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग बनत असते आणि तिचे चाहते नेहमीच तिच्या नवीन चित्रपटांची वाट पाहत असतात. कभी खुशी कभी गमच्या चित्रपटापासून ते जब वी मेटच्या गीतापर्यंत आणि आता बकिंघम मर्डर्सच्या जेस बमराहच्या पात्रापर्येंत करीना कपूर खानने तिच्या अभिनयाने नेहमीच सर्वांची मने जिंकली आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे तिला चाहत्यांसह अनेक मोठ्या कलाकार देखील शुभेच्छा देत आहेत.

Web Title: Kareena kapoor birthday bebo kareena kapoors father told her that she has no future in movies and now she is rocking the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • Kareena Kapoor

संबंधित बातम्या

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन
1

Zero फिगर राखणाऱ्या Kareena Kapoor चा काय आहे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिला डाएट प्लॅन

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत
2

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”
3

करीना कपूरच्या मनात अजूनही ‘ती’ भिती कायम; म्हणाली, “मुलांनी ती घटना इतक्या लहान वयात…”

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
4

सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.