(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कतरिना कैफ प्रेग्नेट असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये रंगत आहेत.पण विकी कौशल आणि कतरिनाने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तर नुकताच तिचा इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो बघून चाहते दावा करत आहेत की अभिनेत्रीचा बेबी बंप त्यात दिसत आहे.
नेटकऱ्यांचा सवाल – ‘किंग’ चित्रपटाची झलक की ‘कल्कि’ निर्मात्यांना उत्तर?
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये कतरिना लाल रंगाच्या गाऊनमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. हा फोटो लांबून काढला गेला आह, ज्यामुळे तो थोडा ब्लर दिसत आहे.या फोटोमुळे विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. हा फोटो रेडिवर शेअर करण्यात आला आहे. कतरिना कैफ शूट करताना दिसत आह, मात्र हा फोटो नेमका मॅटर्निटी फोटोशूटचा आहे की एखाद्या जाहिरातीच्या शूटचा भाग आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Here she is, BTS new picture of Katrina kaif for what looks like an ad
byu/Naive_Cause8984 inBollyBlindsNGossip
Bigg Boss 19 Promo : घरातल्या सदस्यांच्या निशाण्यावर गौरव खन्ना! तोंडावर फासल काळं, सलमान खानने देखील फटकारले
या व्हायरल झालेल्या फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. चाहते आता या फोटो शेअर करत विकी आणि कतरिनाचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने फोटो शेअर करत लिहिले, “ओ गॉड! आमच्या विकी आणि कॅटला बाळ होणार आहे. अभिनंदन! ती तिच्या बेबी बंपसह खूप गोंडस दिसतेय. मला खूप आधीपासून माहित होते की ती गरोदर आहे.” दुसऱ्या चाहत्याने आनंद व्यक्त करत म्हटले, “ओ गॉड! कॅट गर्भवती आहे. ती बाळाला जन्म देणार आहे.” आता चाहते हा फोटो शेअर करत आनंद व्यक्त करत आहेत.
Omg omg omg… Katrina’s expecting 🥺💗🥺💗🥺💗 pic.twitter.com/b25DTPGHF1
— 𓇢𓆸 (@atia_anishah) September 19, 2025
Bigg Boss 19 : प्रणीतऐवजी ही मजबूत स्पर्धक झाली घराबाहेर! संपूर्ण खेळच उलटला, बिग बाॅसने टाकला नवा ट्विस्ट
काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात अभिनेत्री सैल शर्टमध्ये दिसली तेव्हा गरोदरपणाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर असेही बोलले गेले की, ती सैलसर शर्टमध्ये बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करते आहे.कतरिनाने जेव्हापासून सैलसर कपडे घालायला सुरुवात केली आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं कमी केलं, तेव्हापासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू झाल्या. पण विकी आणि कतरिनानेही अनेकदा अशा चर्चांकडे दुर्लक्ष केलं आहे.