(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपट कल्की २८९८ एडीच्या सिक्वेलमधून बाहेर पडल्यापासून ती चर्चेत आहे.दीपिका पदुकोणला प्रभासच्या कल्की या चित्रपटाच्या सिक्वेलमधून काढून टाकण्यात आले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करणारी पोस्ट शेअर केलेली, ज्यात लिहिलेले की, “दीपिका पदुकोण आता ‘कल्की 2898 एडी’ च्या आगामी सिक्वेलचा भाग नसेल. व्यापक विचारविनिमयानंतर, आम्ही आता एकत्र काम करणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. दीपिकाला तिच्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा.” या नंतर, दीपिकाच्या वचनबध्दतेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले , परंतु तिने मौन बाळगले होतो. पण आता तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
दीपिकाने केलेल्या या पोस्टमध्ये, दीपिकाने शाहरूख खानचा हात धरून एक फोटो पोस्ट केला आहे,ज्यामध्ये शाहरूख कडून शिकलेल्या पहिल्या धड्याचा उल्लेख केला आहे. तसेच तिने ‘किंग’ सिनेमाचे शूटिंग सुरू केल्याची घोषणा केली आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाली दीपिका पादुकोण?
“सुमारे १८ वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने मला एक महत्त्वाचा धडा दिला होता. एखादा चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि हा प्रवास तुम्ही ज्यांच्यासोबत करता, ते या चित्रपटाच्या यशापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. तेव्हापासून मी माझ्या प्रत्येक निर्णयात ही शिकवण लक्षात ठेवली आहे. आणि म्हणूनच आम्ही एकत्र आमचा सहावा चित्रपट करत आहोत.” ” तिने शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद यांना टॅग केले आणि #king #day1 हे हॅशटॅग वापरले.
‘तू तुझा दरबार सांभाळ…’, Bigg Boss 19 च्या वीकेंडच्या वारमध्ये अमाल आणि आवेजची टक्कर
या पोस्टमुळे चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोस्टला लोक कल्की या चित्रपटाच्या निर्मात्यांवर अप्रत्यक्ष टोला म्हणून पाहत आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत,एका चाहत्यांने लिहिले, “तुम्ही बेस्ट आहात. नकारात्मकतेपासून दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर फोकस करा.” काही चाहत्यांनी तिला साथ दिली आहे.
‘किंग’ चित्रपटाची थोडक्यात माहिती
किंग या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांच्यासोबत दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत आहेत.तर अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायक म्हणून झळकणार आहे. अभय वर्मा आणि राणी मुखर्जी यांची नावंही या चित्रपटाशी जोडली जात आहेत.