
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या केजीएफला जेव्हा हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केले गेले आणि जगभरात ओळख मिळाली. ‘केजीएफ: चॅप्टर १’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर २’ च्या जबरदस्त यशाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन स्थान मिळाले विशेषतः दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनानंतर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि जगभरात हिट झाला. केजीएफ -चॅप्टर 2 चे सह दिग्दर्शक असलेले किर्तन गाडागौडा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किर्तन नाडागौडा यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार , नाडागौडा यांचा मुलगा याचा अपघात लिफ्टमध्ये झाला आणि तो इतका अचानक घडला की कुटुंबाला मुलाला वाचवण्याची संधीच मिळाली नाही. कन्नड प्रभाने दिलेल्या वृत्तानुसार, निष्पाप सोनार्श लिफ्टमध्ये अडकला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की ही घटना इतकी भयानक आणि अनपेक्षित होती की अजूनही विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या अचानक जाण्याने नादागौडा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि त्यांच्या आयुष्यात एक अपूर्ण पोकळी निर्माण झाली आहे.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पोस्ट
ही दुःखद बातमी कळताच, कन्नड चित्रपट उद्योगात तसेच संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात शोककळा पसरली. असंख्य कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबाला सांत्वन दिले. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.
దర్శకుడు శ్రీ కీర్తన్ నాదగౌడ కుమారుడి దుర్మరణం మనస్తాపం కలిగించింది తెలుగు, కన్నడ భాషల్లో దర్శకుడిగా పరిచయమవుతున్న శ్రీ కీర్తన్ నాదగౌడ కుటుంబంలో చోటు చేసుకున్న విషాదం ఎంతో ఆవేదనకు లోను చేసింది. శ్రీ కీర్తన్, శ్రీమతి సమృద్ధి పటేల్ దంపతుల కుమారుడు చిరంజీవి సోనార్ష్ కె.నాదగౌడ… — Deputy CMO, Andhra Pradesh (@APDeputyCMO) December 15, 2025