(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा स्पाय थ्रिलर “धुरंधर” चित्रपट धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची प्रचंड वाढ अजूनही कमी झालेली नाही. “धुरंधर” या वर्षी प्रदर्शित झालेल्या इतर सर्व प्रमुख चित्रपटांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची गाणी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धुरंधर चित्रपटात बॉलिवूडसह टेलिव्हिजनची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.
रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांसारखे बॉलिवूडचे दमदार स्टार्सही या सिनेमात दिसले आहेत. या सगळ्यात अक्षय खन्ना हा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. त्याच्या अभिनयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अनेक जण यावर रिल्स देखील करत आहेत. या चित्रपटाचा अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावकरचाही समावेश आहे. अंकिताने या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर तिने धुरंधर चित्रपट रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर सुरू झालेल्या एका ट्रेंडमुळे मात्र अंकिताने संताप व्यक्त केला आहे. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अंकिता वालावलकर काय म्हणाली?
अंकिता वालावलकर म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवा… ‘धुरंधर’ पाहणं म्हणजे, Worth Every Minute! चित्रपट पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण यातला प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे…”
मात्र तिने पुढे संताप व्यक्त केला आहे, ती म्हणाली, “Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर, मेंदू, धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला… Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी…” अशा शब्दात तिने सुनावलं आहे.
‘धुरंधर’ सिनेमानंतर सोशल मीडियावर ‘Day 1 As a Spy’ हा ट्रेंड भन्नाट सुरू आहे. यामध्ये इन्फ्लूएन्सर स्वतःला सीक्रेट एजन्ट असून पाकिस्तानात मिशनसाठी आल्याचं सांगतात. पण, पाकिस्तानात सीक्रेटपणे वावरत असताना अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील साध्या सवयींमुळे पकडले जातात, असं या ट्रेंडी व्हिडीओत दाखवण्यात येतं. अगदी साध्या सवयी म्हणजे, गुरुवारी बिर्याणी खायला नकार देणं, कुणाला पाय लागला की, पाया पडणं किंवा गायीला नमस्कार करणं… यांसारख्या अनेक सवयी या ट्रेंडी व्हिडीओ करण्यासाठी वापरण्यात आल्यात. यावरुन तिनं असे रिल्स बनवणाऱ्यांना चांगलंच झापलंय.
तिने पुढे असंही म्हटलं, “आता जेवढे क्रिएटर्स या ट्रेंडवर रील बनवत आहेत, ते कदाचित २६ जानेवारी, १५ ऑगस्टलाही देशसेवेवर रील्स बनवतील. पण तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हे लोक काय करत आहेत. थोडंसं वाचन करा. आजकालचं जग फेम आणि क्रेडिटवर चालतं, पण हे स्पाय आहेत, त्यांना फेम किंवा क्रेडिट मिळत नाही. त्यांचे नाव कुठे येत नाही. हे सगळं विचारात घ्या आणि आपला ट्रेंड म्हणून बनवायच्या रील्स थांबवा.”






