(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि संत प्रेमानंद महाराज. ते वृंदावन येथील एक मोठे राधा-कृष्ण भक्त संत आहेत आणि त्यांचे प्रवचन मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. सामान्य लोकांपासून ते मोठमोठे सेलिब्रेटीदेखील त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी वृंदावनला येतात. अशातच भोजपुरी चित्रपट स्टार खेसारी लाल यादवने प्रेमानंद जी महाराजांबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेता वादात सापडला आहे. खेसारीने पोस्ट शेअर करून म्हटले की काही लोक प्रेमानंद जी महाराजांकडे त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी जात आहेत. अभिनेत्याने कोणाचेही नाव घेतले नाही. या पोस्टनंतर काही युजर्स खेसारीवर संतापले आणि आता अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
खेसारीची पोस्ट
खेसारीलाल यादवने इन्स्टाग्राम पोस्टवर प्रेमानंद महाराजांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘एक आवाहन, प्रेमानंद महाराजांचा अनुभव घ्या. गेल्या काही दिवसांपासून मी लक्षात घेतले आहे की बरेच लोक त्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी तिथे जाऊ लागले आहेत. पण ते पाप धुण्याचे मशीन नाहीत. खऱ्या श्रद्धेने त्यांच्या शब्दांचे पालन करा. फक्त प्रसिद्धीसाठी तिथे जाणं योग्य नाही.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
खेसारीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि लोक याबद्दल वेगवेगळी मते देत आहेत. एका वापरकर्त्याने त्याला पाठिंबा देत लिहिले की, ‘खूप खूप धन्यवाद भाऊ, किमान तुमच्यात हे सांगण्याची हिंमत आहे, बाकी सर्व तर….’ तर एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जा ज्याने ९४० कोटींचे पाप केले आहे…’
एक अपील
प्रेमानंद महाराज को बस अनुभूति कीजिए, कुछ दिन से नोटिस किए की कई लोग Image Making के लिए वहाँ जाने लगे हैं। वो पाप धोने वाले मशीन नहीं हैं। सच्ची श्रद्धा है तो बस उनके बातो को अनुसरण कीजिए। हर जगह प्रमोशन और प्रचार ठीक नहीं लगता ।
भोरे भोरे ज़्यादा ज्ञान लगे फिर भी ठीक… pic.twitter.com/Y9cBdvoLra
— Khesari Lal Yadav (खेसारी) (@khesariLY) August 18, 2025
प्रेमानंद जी महाराजांसाठी खेसारीचे भक्तीगीत
खेसारी स्वतः प्रेमानंद महाराजांचा खूप आदर करतात. काही काळापूर्वी त्यांनी प्रेमानंद जी यांच्यावरील ‘तेरे प्रेम में पागल प्रेमानंद’ हे भक्तीगीत रिलीज केले होते, जे युट्यूबवर ५५ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडले. पण आता त्यांच्या पोस्टमुळे खेसारी स्वतः वादात अडकले आहेत.
‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
राज कुंद्राला मारले टोमणे
तसेच, काही लोकांचे असे म्हणणे आहे की या पोस्टद्वारे खेसारीने शिल्पा शेट्टी आणि त्यांचा पती राज कुंद्रा यांना टोमणे मारले आहेत. अलीकडेच राज कुंद्रा त्यांच्या पत्नी शिल्पा शेट्टीसह प्रेमानंद जी महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनमधील केली कुंज आश्रमात गेले होते. राज कुंद्रा अनेक वर्षांपासून मनी लाँड्रिंग, क्रिप्टोकरन्सी आणि फसवणूक अशा अनेक वादात अडकले आहेत. अलीकडेच एका व्यावसायिकाने त्यांच्यावर आणि शिल्पा शेट्टीवर ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला. त्यानंतर लगेचच राज कुंद्रा प्रेमानंद महाराजांना भेटायला गेले आणि त्यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला लोकांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले.