(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘चिरंजीवी हनुमान-द एटरनल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट देखील खास आहे कारण देशातील पहिला एआय जनरेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची कथा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा
निर्मात्यांनी दाखवली चित्रपटाची पहिली झलक
अॅबंडंशिया एंटरटेनमेंट आणि कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्क संयुक्तपणे बजरंगबलीची कथा पडद्यावर आणत आहेत आणि तीही एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. निर्मात्यांनी आज चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरसोबतच निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘चिरंजीवी हनुमान-द इटरनल’ चित्रपटाची कालातीत कथा थिएटरमध्ये सादर करणे अभिमानाची गोष्ट आहे.
पुढील वर्षी हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार चित्रपट
तसेच निर्मात्यांनी पुढे लिहिले, हा अशा प्रकारचा पहिला चित्रपट आहे, जो मेड-इन-एआय आणि मेड-इन-इंडिया अवतारात आहे. आपल्या संस्कृती आणि वारशाने समृद्ध असलेला हा चित्रपट आम्ही २०२६ मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करणार आहोत.’ असे लिहून चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहे.
Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
५० अभियंत्यांची टीम चित्रपटावर करणार काम
चित्रपटाच्या नावावरून स्पष्ट होते की, हा चित्रपट भगवान हनुमानावर आधारित आहे. हा रामायण आणि भारतीय पौराणिक कथांसारख्या महाकाव्यांपासून प्रेरित चित्रपट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५० हून अधिक अभियंत्यांची टीम एकत्रितपणे हा चित्रपट बनवत आहे. अभियंत्यांची टीम सांस्कृतिक विद्वान आणि साहित्यिकांच्या मदतीने त्याची पटकथा आणि कथेला वास्तविक रूप देण्यात गुंतलेली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची घोषणा होताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. नेटिझन्स कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवलेला हा चित्रपट पाहण्याचा अनुभव खूप मनोरंजक असेल असे चाहत्यांचे म्हणणे आहे.