(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘डंकी’ नंतर शाहरुखचा कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर आलेला नाही. दरम्यान, त्याच्या ‘किंग’ चित्रपटाशी संबंधित काही मनोरंजक माहिती समोर आली आहे, जी जाणून घेतल्यास चाहत्यांचा उत्साह आणखी वाढेल. चित्रपटामध्ये लवकरच शाहरुख खानसोबत एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री प्रवेश करणार आहे. तसेच यादरम्यान आता दीपिका पदुकोण आणि करीना कपूर या दोन्ही अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. परंतु आता कोणती अभिनेत्री अभिनेत्यासह चमकणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.
‘किंग’ मध्ये कोणती अभिनेत्री दिसणार?
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या चित्रपटात दीपिका पदुकोण किंवा करीना कपूर दिसू शकतात. असे वृत्त आहे की निर्माते विशिष्ट भूमिका साकारण्यासाठी दोघांपैकी एकाची निवड करू शकतात. परंतु आता कोणती अभिनेत्रीची निवड होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
Lilo and Stitch चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर लोक करतायत कौतुक!
शाहरुखसोबत या चित्रपटांमध्ये दिसली होती दीपिका
दीपिका आणि करिना दोघांनीही शाहरुखसोबत याआधी काम केले आहे. दीपिकाने २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, ज्यामध्ये शाहरुख तिचा नायक होता. यानंतर दोघेही ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. तर, करीनाने शाहरुखसोबत ‘कभी खुशी कभी गम’, ‘अशोका’, ‘डॉन’ आणि ‘रावन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली. ‘किंग’मध्ये शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ‘मुंज्या’ फेम अभय वर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार या चित्रपमध्ये दिसणार आहेत.
Historical Shows On OTT: ऐतिहासिक वेबसीरीज आवडतात का ? तर OTT वर पाहा ‘हे’ शो
चित्रपटाबद्दल किंग खानचा मनोरंजक दावा
अलीकडेच, लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘किंग’ बद्दल बोलताना, शाहरुखने पुष्टी केली होती की तो या चित्रपटात काम करणार आहे. त्याच वेळी, अबू धाबीमधील एका कार्यक्रमादरम्यान, शाहरुखने या चित्रपटाबाबत आणखी काही अपडेट्स दिले. तो म्हणाला होता, “मी काही महिने त्याचे शूटिंग करणार आहे. माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप कडक आहे. त्याने ‘पठाण’ देखील बनवला होता. त्याने मला काहीही सांगण्यास मनाई केली आहे. मी जास्त काही सांगू शकत नाही, पण मी वचन देतो की तुम्हाला चित्रपट पाहण्याचा आनंद मिळेल.” असे अभिनेता चाहत्यांना म्हणाला आहे.