(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टॉलिवूड स्टार विजय देवरकोंडा त्याच्या नवीन चित्रपट “किंगडम” च्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसिद्ध साऊथ दिग्दर्शक सुकुमार यांनी विजयच्या आगामी “किंगडम” चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुकुमार यांनी विजयचा या चित्रपटामधील अभिनय पाहून त्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्याला ते नक्की काय म्हणाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
१२३ तेलुगु.कॉम मधील एका वृत्तानुसार, अलीकडेच माध्यमांशी बोलताना विजयने सांगितले की, प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांनी “किंगडम” चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना अभिनेत्याला फोन केला आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. विजय म्हणाला, “सुकुमार सरांची प्रशंसा माझ्यासाठी खूप खास आहे. मी त्यांचा खूप आदर करतो.” विजयने असेही सांगितले की, ‘अर्जुन रेड्डी’ पासून तो आणि ‘सुकुमार’ यांच्या सोबत एकत्र काम करण्याची योजना आखत आहेत. तो म्हणाला, “आम्हाला भविष्यात एकत्र काम करण्याची आशा आहे, परंतु सध्या माझे लक्ष माझ्या सध्याच्या प्रकल्पांवर आहे.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.
रजनीकांतच्या ‘Coolie’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते चकीत, बॉक्स ऑफिसवर ‘या’ दिवशी होणार धमाका
किंगडमला मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
‘किंगडम’ हा चित्रपट आधी ३० जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. नंतर त्याची रिलीज डेट ४ जुलै करण्यात आली. परंतु आता हा चित्रपट ३१ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे, तर हा चित्रपट सीतारा एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित आहे. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे विजय देवरकोंडा यांच्यासोबत दिसणार आहे. अभिनेत्याचा चित्रपटामधील लूक पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विजय देवरकोंडाची कारकीर्द
माध्यमांच्या वृत्तानुसार, २०२० मध्ये निर्माते केदार सेलागमसेट्टी यांनी विजय आणि सुकुमार अभिनीत चित्रपटाची घोषणा केली होती, परंतु तो प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. अलीकडेच विजयचा ‘किंगडम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विजयच्या चाहत्यांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे. गौतम तिन्नानुरी लिखित आणि दिग्दर्शित तेलुगू स्पाय ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘किंगडम’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये ‘साम्राज्य’ या नावाने प्रदर्शित झाला आहे. सितारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमाजच्या बॅनरखाली हा चित्रपट बनला आहे.