
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानू यांनी त्यांची एक्स पत्नी रीता भट्टाचार्य यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गायक ३० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. आणि रीता यांनी कथितपणे केलेल्या बदनामीकारक विधानांच्या मुलाखती काढून टाकण्याची मागणी करत आहेत. या खटल्याची सुनावणी १७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
गायक कुमार सानू आणि त्यांची पत्नी रीता भट्टाचार्य यांचा घटस्फोट २००१ मध्ये झाला. त्यांना एक मुलगा आहे, जान कुमार सानू, जो “बिग बॉस १४” या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. ही याचिका वकील सना रईस खान यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती, जी “बिग बॉस १७” मध्ये देखील सहभागी होती. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
‘तस्करी’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री; संपूर्ण स्टारकास्टची दाखवली झलक
एक्स पत्नीने केले हे गंभीर आरोप
याचिकेनुसार, रीता भट्टाचार्य यांनी अनेक प्लॅटफॉर्मवर मुलाखती दिल्या, ज्यात त्यांनी कुमार सानूवर तिच्या गरोदरपणात वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला. तिने असा दावा केला आहे की कुमार सानूने तिला उपाशी ठेवले, स्वयंपाकघरात बंद केले, तिचे दूध किंवा वैद्यकीय सेवा नाकारली आणि तिच्या गरोदरपणात तिच्याविरुद्ध कायदेशीर खटलाही दाखल केला. तिने कुमार सानूवर अनेक अफेअर्स आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला. आता या सगळ्या खोट्या आरोपांवर गायकाने मानहानीचा खटला दाखल करून, ३० लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.
२००१ मध्ये घटस्फोट घेतला
सप्टेंबर २०२५ मध्ये, त्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, ज्यामुळे कुमार सानू यांना कायदेशीर कारवाई करावी लागली. वकील सना रईस खान यांनी असा युक्तिवाद केला की या विधानांमुळे ९ फेब्रुवारी २००१ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या संमती कराराच्या अटींचे उल्लंघन झाले आहे, ज्यामध्ये असे म्हटले होते की कोणताही पक्ष भविष्यात दुसऱ्यावर आरोप करू शकत नाही.
Dhurandhar चा Box Office वर ७०० कोटींचा गल्ला; १३ दिवसांत अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड
गायकाची प्रतिष्ठा खराब झाली
मानहानीच्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की या विधानांमुळे कुमार सानूच्या प्रतिमेला आणि मानसिक त्रासाला मोठे नुकसान झाले आहे. २७ सप्टेंबर रोजी, रीता भट्टाचार्य आणि मीडिया पोर्टल्सना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये मुलाखती काढून टाकल्या नाहीत तर फौजदारी खटला चालवण्याचा इशारा देण्यात आला होता.