(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
स्टार प्लसवरील हिट शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ सध्या टीव्हीच्या दुनियेत जबरदस्त गाजत आहे. तुलसी आणि मिहिर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या शोची कथा, त्यातील रोमांचक वळणं आणि भावनिक क्षण यांमुळे प्रेक्षक सातत्याने जोडले गेले आहेत.शोमध्ये अनेक नवीन पात्रांची दमदार एन्ट्री झालेली आहे आणि आता तर आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी एपिसोडमध्ये २ हॉलीवुड कलाकार या मालिकेत एन्ट्री घेणार आहेत! या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या सहभागामुळे या शोला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे.
अलीकडेच पार्वतीच्या एंट्रीनंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच या शोमध्ये एका आंतरराष्ट्रीय सुपरस्टारची ग्रँड एंट्री होणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्कर विजेता हॉलीवुड अभिनेता विल स्मिथ लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहेत!हे हॉलीवुडचे मेगास्टार आता भारतीय ड्रामाच्या जगतात एक नवीन पाऊल टाकणार आहेत.
दीपिकाची छबी, गालावर खळी; रणवीर-दीपिकाने घरच्या ‘लक्ष्मी’चा चेहरा केला Reveal
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सारख्या लोकप्रिय मालिकेत त्यांची एन्ट्री ही एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो. त्यांच्या आगमनामुळे केवळ मालिकेला नवसंजीवनी मिळेल असं नाही, तर भारतीय टेलिव्हिजनलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळण्याची संधी निर्माण होईल.
प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत की विल स्मिथ कोणत्या भूमिकेत झळकणार, त्यांचा कथानकावर काय प्रभाव पडणार आणि त्यांच्या पात्रामुळे तुलसी, मिहिर आणि इतर पात्रांच्या आयुष्यात कोणते नवीन वळणं येणार.
खरं तर, विल स्मिथचं व्यक्तिगत आयुष्यातलं एक अत्यंत चर्चित क्षण देखील या भूमिकेचा संदर्भ बनू शकतो. तो क्षण जेव्हा त्यांनी ऑस्कर अवॉर्ड्समध्ये आपली पत्नी जादा पिंकेट स्मिथ यांच्यावर झालेल्या टिप्पणीमुळे स्टेजवर जाऊन कॉमेडियनला फटकारलं.
जर या बातम्या खऱ्या असतील, तर विल स्मिथचा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधला प्रवेश खूप खास ठरेल.तो शोमध्ये येऊन एक मोठा संदेश देऊ शकतो.