दीपिका रणवीरने दिली चाहत्यांना दिवाळीची खास भेट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दीपिका आणि रणवीरच्या गोंडस मुलीचा चेहरा बघण्याची चाहत्यांची इच्छा अखेर आज पूर्ण झाली आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर दुवाचे फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. चाहतेच नाही तर अक्षरशः संपूर्ण चित्रपटसृष्टीने या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दीपिका आणि रणवीरच्या मुलीचा दुवाचा १ वर्षापूर्वी जन्म झाला आणि तेव्हापासून चाहत्यांना ती नक्की कोणासारखी दिसते ते पाहण्याची उत्सुकता होती. ही उत्सुकता शिगेला पोहचली होती आणि आता १ वर्षानंतर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत दीपिका आणि रणवीरने आपल्या घरच्या ‘लक्ष्मी’चे अर्थात दुवाचे सर्वांना दर्शन दिले आहे असंच म्हणावं लागेल.
आई झाल्यानंतर Deepika Padukoneने केला मोठा बदल, इन्स्टाग्रामवर दिसली खास झलक, फोटो होतोय व्हायरल!
दीपिकासारखी गोड दुवा
दीपिका आणि रणवीरची मुलगी नक्की कशी असेल असा त्यांच्या चाहत्यांना प्रश्न नक्कीच पडला होत आणि आता तिचा चेहरा समोर आल्यानंतर दुवा ही दीपिकाचीच छबी वाटेल अशी दिसायला गोंडस आहे अशा अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. दीपिकाप्रमाणेच दुवाच्यादेखील गालावर खळी पडलेली दिसून येत आहे आणि नक्कीच दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही अधिक आनंदाची बाब ठरतेय.
रणवीर-दीपिकाने केली दिवाळी हॅप्पी
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी दिवाळीच्या खास प्रसंगी त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या जोडप्याने पहिल्यांदाच त्यांच्या मुली दुआचा चेहरा चाहत्यांसमोर आणला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर त्यांच्या लहान मुली दुआला आपल्या मांडीवर घेत असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये दुआ खूपच गोंडस दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता सर्वांना मोहित करत आहे.
दुवाचे आई-वडिलांसह ट्विनिंग
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर दुआचे फोटो शेअर करताच, इंटरनेटवर आनंदाची लाट उसळली. चाहते आणि सेलिब्रिटी दोघेही कमेंट सेक्शनमध्ये दुआवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. फोटोंमध्ये दुआ लाल रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिने तिच्या पालकांसोबत जुळणारे गुलाबी रंगाचे कपडे घातलेले देखील दिसत आहे आणि तिने दोन लहान पोनीटेल देखील बनवल्या आहेत, ज्या तिच्यावर खूप गोंडस दिसतात.
Deepika Padukone: दीपिका पादुकोण बनली Meta AI चा नवा आवाज, अभिनेत्रीच्या कामगिरीने चाहते खुश
पहा दुवाचे फोटो