(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. लायब्ररीला लागलेल्या आगीत काव्याने पार्थ देशमुखांनी दिलेलं ट्विन घड्याळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून आत शिरते. काव्याचा जीव धोक्यात पाहून पार्थ देखील आगीत उडी घेतो आणि तिला वाचवतो. मात्र या धाडसात पार्थ स्वतः आगीत अडकतो आणि गंभीर जखमी होतो.
पार्थला तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं. पण तिथेही नवा ट्विस्ट! काव्याला पार्थला भेटू न देण्यासाठी मानिनी जोरदार विरोध करते. त्यातच पार्थ कोमात गेल्याची धक्कादायक माहिती जीवा देतो. हे ऐकताच काव्या धावपळ करत रुग्णालयात जायला निघते, पण मानिनी तिला पार्थची शपथ देते!दरम्यान, देशमुख कुटुंबीय पार्थची प्रकृती सुधारल्याचे समजल्यावर घरी परततात. पण पुन्हा पार्थच्या कोमात गेल्याच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसतो आणि सर्व रुग्णालयात धाव घेतात.
पार्थ बरा व्हावा यासाठी मानिनी काव्याला एक कठोर संकल्प सुचवते, हातात जळता निखारा घेऊन मंदिराला १०१ प्रदक्षिणा घाल!
ही मागणी करताना मानिनी काही जुन्या गोष्टींचा संदर्भ देते. वटपौर्णिमेला जीवा बरा व्हावा म्हणून नंदिनीने पायाला दुखापत असूनही झाडाला फेऱ्या मारल्या होत्या, हे ती आठवते.तसंच विक्रम देशमुख आणि स्वतः मानिनीने सुद्धा अशा कठीण प्रसंगात देवापुढे कठोर नवस केल्याचं ती सांगते, आणि काव्यालाही तेच करायला लावते.देशमुख कुटुंबीय रुग्णालयात गेल्यावर मानिनीचे शब्द आठवत काव्या मंदिरात जाते. याच मंदिरात आधी ती जीवाबरोबर आली होती. तेव्हाचा प्रसंग तिला आठवतो. नंतर ती पार्थसाठी प्रार्थना करते. पार्थला बरं कर अशी विनंती ती देवीसमोर करते. ती देवीआईच्या मंदिरात १०० दिवे लावते.
आता स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोत नंदिनी पार्थला म्हणते की ‘तुम्हाला काव्यासाठी जगावंच लागेल.’ दुसरीकडे काव्या, तुम्हाला शुद्धीवर यावंच लागेल पार्थ,’ असं म्हणते. नंतर काव्या दिवा लावते, पण वाऱ्यामुळे काही दिवे विझतात व एक दिवा पडतो. दुसरीकडे रुग्णालयात पार्थची प्रकृती आणखी बिघडते. तर मानिनी रुग्णालयात रडताना व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. आता पार्थ बरा होणार की नाही, ते या आठवड्यात पाहायला मिळेल.हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी टीका केली आहे, ‘काव्यार्थच्या प्रवासासाठी हा ट्रॅक खरा टर्निंग पॉइंट आहे, तो नीट एक्झिक्युट झाला पाहिजे. ऑनस्क्रीन व ऑफ स्क्रीन दोन्हीही. आता मालिका बघायला इंटरेस्टिंग होईल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. काही जणांनी मात्र, मालिकेच्या या ट्विस्टवर टीका केली आहे.
‘काजळमाया’ने वेधले प्रेक्षकांचं लक्ष! स्टार प्रवाहच्या ‘या’ दोन मालिका होणार बंद?
‘हे काय आहे… काहीही काय दाखवतात यार…या डॉक्टरांच्या डिग्री चेक करायला पाहिजेत आधी. अरे Heigh Co2 Environment मधल्या पेशंटला इतके कॅज्युअली घेतात की O2 लावायला सुद्धा हे Dyspnea ची वाट बघत बसतायत… बर स्वतःच सांगतायत Co2 फुफ्फुसात साठला असावा मग COPD च्या केसमध्ये व्हेंटिलेटर सोडून साधं O2 च मास्क का लावलंय आणि लावला होतं तर काढलं कशाला. या दिव्याच्या लॉजिकच्या नादात मेडिकल डिग्रीला व्हेंटिलेटर लावायची वेळ आलीये,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. त्याचबरोबर जीवा-नंदिनीला काव्या व पार्थसाठी साईडलाइन केलंय असं एका युजरने म्हटलंय. ‘किती ओव्हररिअॅक्ट, काहीही दाखवतात,’ ‘एक नंबर फालतू मालिका.. यात काहीही लॉजिक नसतं,’ ‘परत इतर मालिकांसारखा मेलोड्रामा’, ‘फालतू मालिका,’ ‘नक्की शुद्ध येणार…काळजी करू नका,’ अशा कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.