(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते Raju Talikote यांचे निधन, दक्षिण चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची झैल यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘काजलमाया’ ही हॉरर मालिका २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका फक्त रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. काजलमाया सुरू होणार असल्याने, स्टार प्रवाहवरील ‘तू ही माझा मितवा’, १०:३० वाजता प्रसारित होणारी मालिका संपणार असे दिसते आहे. पण महत्त्वाची अपडेट म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलल्यात आली आहे.
‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आता रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. १०:३० मालिका आता लवकर म्हणजे रात्री ८ वाजता पाहायला मिळणार त्यामुळे मालिकेचे चाहते खुश आहेत. पण ‘तू ही रे माझा मितवा’ ८ वाजता लागणार म्हणजेच ८ ला लागणारी ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असे देखील प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
‘छावा’ चा ‘कांतारा चॅप्टर १’ लवकरच मोडणार रेकॉर्ड? ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा १२ व्या दिवशीही धबधबा
‘काजळमाया’ या मालिकेमुळे मालिकांच्या वेळांची गणितं बदलली आहे. रात्री ८ वाजता लागणारी ‘काय होतीस तू काय झालीस तू’ ही संपणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता रात्री ८ ऐवजी रात्री ११ वाजता पाहायला मिळणार आहे. मालिकेची वेळ बदलल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या मालिकेला प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळणार जेवढा आधी मिळत होता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






