
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अलिकडेच, माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चाहते चिंतेत होते. परंतु, माही विजने स्वतः सर्व अफवा फेटाळून लावल्या आणि आता तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे की ती नऊ वर्षांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री पुन्हा परतणार आहे. ही बातमी अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच चाहते या बातमीने आनंदी झाले आहेत.
अभिनेत्रीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये परतल्याची घोषणा करताना दिसली आहे. नऊ वर्षांच्या ब्रेकनंतर, ही सुंदरी कलर्सच्या शो “सेहर होने को है” मध्ये दिसणार आहे. तिच्या नवीनतम व्लॉगमध्ये, अभिनेत्रीने असेही शेअर केले आहे की ती लवकरच तिच्या नवीन प्रोजेक्टचे शूटिंग सुरू करणार आहे. तिच्या व्हिडिओमध्ये सेटची झलक दाखवताना तिने खुलासा केला की ती नवीन शोमध्ये एका किशोरवयीन आईची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्रीची नवीन भूमिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
माही विज या मालिकेतून करणार कमबॅक
सोशल मीडियावर व्लॉग शेअर करताना अभिनेत्री माही विज म्हणाली, “आम्ही लखनऊमध्ये आर्धी शूटिंग पूर्ण करणार आहोत. बॅकलॉग पूर्ण करणार आहोत. आज आम्ही काही पॅचवर्क करू. माझ्या मुलांना मागे सोडल्याबद्दल मला दोषी वाटते.” जेव्हा मी परत येऊ इच्छित होते, तेव्हा मला चांगले काम मिळत नव्हते आणि मी इन्स्टाग्रामद्वारे चांगली कमाई करत होते. पण मला पुन्हा अभिनयात यायचे होते. आणि मी पुन्हा नवीन सुरुवात करत आहे. ‘ असे ती म्हणाली.
जय भानुशालीने महागडी लिपस्टिक दिली भेट
अलीकडेच, १४ वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपे वेगळे होत असल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. काहींनी असा दावाही केला होता की अभिनेत्रीने तिच्या पतीकडून ५ कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. जय भानुशालीसोबत घटस्फोटाच्या वृत्तांचे माही विजने खंडन केले आहे. तिच्या व्लॉगमध्ये माही विजने जय भानुशालीकडून मिळालेल्या भेटवस्तूचाही उल्लेख केला आहे. तिने खुलासा केला की जयने तिची ख्रिश्चन डायर लिपस्टिक जपानहून आणली होती.
सुरु झाली लगीनघाई ! अखेर सूरज चव्हाण अडकणार लग्नबंधनात; अंकिताने दाखवली वहिणीची झलक
या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, जय भानुशाली आणि माही विज यांनी २०११ मध्ये लग्न केले आणि २०१७ मध्ये त्यांना दोन दत्तक मुलांचे संगोपन केले. आणि २०१९ मध्ये, हे जोडपे तारा नावाच्या मुलीचे पालकही झाले. आता या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.