(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केला होता. या पोस्टनंतर सूरजची बायको कोण असेल,हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले. त्यानंतर अंकिता वालावलकरसुद्धा सूरजच्या गावी गेली आणि तिने सूरजच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतलेली. अंकितानेही तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. पण, तिचा चेहरा दाखवला नव्हता. अशातच आता अंकिताने सूरजच्या केळवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि तिची झलक शेअर केली आहे.
सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर Anunay Sood चे निधन, वयाच्या ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अंकिताने शेअर केली सूरजच्या बायकोची झलक
शेअर केल्या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणतेय की, ‘लग्नाची तयारी सुरू झालीये, मग केळवण तर असणारच ना! बघायचंय कोणाचं आहे, चला!’ असं म्हणत अंकिताने सूरजच्या पत्नीची झलक दाखवली आहे.’ सूरज चव्हाणच्या बायकोचे नाव देखील उघड झाले आहे. तिचे नाव संजना असून अंकिता वालावलकरने नुकतंच दोघांचं केळवण केले. आणि यावेळी सूरजने संजनासाठी आणि संजनाने सूरजसाठी उखाणा देखील घेतला आहे.
व्हिडीओमध्ये उखाणा घेताना सूरज म्हणाला, ‘बिग बॉस’ जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न…संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!’ पुढे संजनाने सूरजसाठी उखाणा घेतला की, ‘बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको…सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!’ हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहते त्याच अभिनंदन करत आहेत.
अंकिताने केली केळवणाची संपूर्ण तयारी
अंकिताने सूरज आणि संजनाच्या केळवणाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरु केली होती. यावेळी अंकिताने फुलांची सजावट केली सूरज आणि संजनासाठी पुरी-भाजीचा बेत केला होता. आणि अंकिताने दोघांच औक्षण देखील केले, त्यानंतर दोघांनाही भेटवस्तू दिल्या. हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले ‘सूरज आणि संजना…सूरजचं केळवण.’ या व्हिडिओला आता चाहते पसंत करत आहेत. आणि कंमेंट करून चाहते प्रतिसाद देत आहेत.






