(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक वृत्तानुसार, हेमलता बाणे पाटकर (३९) ही मराठी अभिनेत्री दहा कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे. तसेच अभिनेत्रीसोबत अमरीना मॅथ्यू फर्नांडिस अश्या आणखी एक महिलेला अटक करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या दोघींवर करण्यात आला आहे. हेमलताच्या अटकेनंतर याबद्दलही चर्चा झाली आहे, ती ‘आई कुठे काय करते’मध्ये झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. याप्रकरणी आता स्वत: अर्चना यांनी पोस्ट शेअर करत आपले मत मांडले आहे.
अर्चना पाटकर यांनी स्पष्ट केले की, हेमलता आणि त्यांच्या मुलगा चार वर्षांपूर्वी विभक्त झाले आहेत. त्यांचा आता तिच्याशी काहीही संबंध नाही. शिवाय त्यांनी अटक झाल्याचे वृत्त खरे असल्याचेही म्हटले आहे. तसेच अभिनेत्रीच्या या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Dharmendra Last Movie: वडिलांचा शेवटचा चित्रपट पाहून Bobby Deol झाला भावूक; Video इंटरनेटवर Viral
अर्चना पाटकर नक्की काय म्हणाल्या?
अर्चना यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली ४० वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटींच्या खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत.’
त्यांनी पुढे लिहिले की, ‘मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झालाय. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद- अर्चना पाटकर’.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अर्चना यांनी शेअर केलेल्या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत पाठिंबा दिला आहे. एका युजरने कमेंट केली की, ‘तुमच्या कामाबद्दल आम्हला अतिशय आदर आहे, स्पष्टीकरण दिल्यानं चर्चा नक्की थांबतील.’ यावर रिप्लाय करत अर्चना यांनी आभार मानले. तर अन्य एकाने असे लिहिले, ‘मला तर ते तसेही खरे वाटले नव्हते’ आणि या कमेंटवर अर्चना यांनी स्वत: रिप्लाय दिला. त्यांनी म्हटले की, ‘बातमी खरी आहे.’
काय आहे प्रकरण?
‘गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपी’ नावानं व्यवसाय करणाऱ्या एका महिलेनं मुलाच्या लग्नानिमित्त १४ नोव्हेंबरच्या रात्री आंबोलीमधील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा हा होणारी पत्नी आणि मित्र मैत्रिणींसह लिफ्टनं हॉटेलमधून खाली उतरत असताना एक महिला लिफ्टमध्ये शिरली. त्यावेळी लेझर लाइटवरून या महिलेनं भांडण उकरून काढलं आणि लिफ्टमध्येच हाणामारी झाली.
‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार
बांधकाम व्यावसायिकेच्या मुलावर आरोप करीत या महिलेनं आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच हेमलता पाटकर आणि अमरीना असं नाव सांगणाऱ्या दोघींनी बांधकाम व्यावसायिकेला आणि त्यांच्या मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी दहा कोटींची मागणी केली. तडजोडीनंतर साडेपाच कोटी रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं. बांधकाम व्यावसायिकेनं या प्रकरणाची तक्रार गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार लोअर परळ इथं सापळा रचण्यात आला आणि दीड कोटी रुपयांचा पहिला हफ्ता घेताना या दोघींना पकडण्यात आलं. शनिवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






