
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“मेरा भोला है भंडारी” फेम गायक हंसराज रघुवंशी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील एका सदस्याने या धमकीची जबाबदारी स्वीकारली आहे. गायक आणि त्याच्या कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गायकाचा सुरक्षारक्षक विजय कटारिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मशहूर गायक हंसराज रघुवंशीला धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतः सांगितले की तो लॉरेंस बिश्नोई गँगचा सदस्य आहे. मोहाली पोलिसांनी सिंगरच्या पर्सनल गार्डच्या तक्रारीवर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीची ओळख राहुल कुमार नागड़े अशी पटली असून तो मध्य प्रदेशच्या उज्जैनचा रहिवासी आहे.
गायकाच्या सुरक्षा रक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हंसराजने २०२१-२०२२ मध्ये उज्जैनमधील एका मंदिरात त्याला धमकी देणाऱ्या राहुलची भेट घेतली. आता, आरोपीने गायकाला व्हॉट्सअॅप कॉल करून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राहुलने १५ लाख रुपयांची खंडणीही मागितली आहे. पैसे न दिल्यास त्याने गायकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य म्हणूनही करून दिली.
हंसराज रघुवंशी हा भजन गायक म्हणून ओळखले जातो आणि धार्मिक गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सर्वात लोकप्रिय गाणे ‘मेरा भोला है भंडारी’ आहे. याशिवाय त्यांनी ‘राधे-राधे’, ‘शिव समा रहे’, ‘लागी लगन शंकरा’, ‘जय श्री राम’, ‘भोलेनाथ’ आणि ‘गंगा किनारे’ अशा अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांना दिली आहेत.