(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना स्टारर “थामा” हा चित्रपट या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये “थामा” बद्दल उत्सुकत निर्माण झाली होती. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं फक्त पहिल्या चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. भारतभरात चित्रपटाने सुमारे ६५.६० कोटी रुपये कमावले आहेत.आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट ‘थामा’ ही निरेन भट्ट, सुरेश मैथ्यू आणि अरुण फालरा यांच्या लेखनात तयार झाली आहे.
हा चित्रपट मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स (MHCU) चा पाचवा चित्रपट असून, याआधी ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘भेड़िया’ आणि ‘मुंज्या’ सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर घर केले होते. ‘थामा’ची पहिली कामगिरी पाहता, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानेही प्रेक्षकांमध्ये चांगली छाप सोडली आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराणाची हॉरर-कॉमेडी फिल्म ‘थामा’ ने बॉक्स ऑफिसवर ५व्या दिवशी १३ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. ओपनिंग डेवर २४ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर थोडीशी घसरण झाली, तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.
‘मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही’; बॉलीवूडच्या दबंगबद्दल असं का म्हणाले महेश मांजरेकर ?
भारतभर चित्रपटाने आतापर्यंत ७८.६० कोटी रुपये कमावले आहेत. तर, वर्ल्डवाइड कलेक्शन पाहता ‘थामा’ ने १०५.५ कोटी रुपये कमावून स्वतःला १०० कोटी क्लबमध्ये सामील केले आहे.
आयुष्मान खुराणाची हॉरर-कॉमेडी फिल्म ‘थामा’ ने वर्ल्डवाइड १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला असला, तरीही ती काही सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे. सध्याच्या परिस्थितीत, ‘थामा’ ऋषभ शेट्टीची ‘कांतारा चैप्टर १’ ८००.२ कोटी, अहान पांडेची ‘सैयारा’ ५७०.३२ कोटी, रजनीकांतची ‘कुली’ ५१८ कोटी, ऋतिक रोशनची ‘वॉर २’ ३६४.३५ कोटी आणि पवन कल्याणची ‘दे कॉल हिम ओजी’ २९४.८७ कोटी या चित्रपटांच्या मागे आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की, ‘थामा’ ने सुरुवातीला दमदार कमाई केली असली तरी बॉक्स ऑफिसवर अजूनही काही ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.






