(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मल्याळम अभिनेता मोहनलाल यांनी त्यांच्या आगामी “दृश्यम ३” चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी सेटवर पूजा केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “जॉर्ज कुट्टीच्या जगाला पुन्हा एकदा जिवंत करत, ‘दृश्यम ३’ आज पूजेने सुरू होत आहे.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या बातमीने चाहते खुश झाले आहे. आता “दृश्यम ३” चित्रपटासाठी ते उत्सुक आहेत.
हा चित्रपट दृश्यमचा सिक्वेल
“दृश्यम ३” हा मल्याळम चित्रपट “दृश्यम” (२०१३) चा सिक्वेल आहे. क्राईम थ्रिलर “दृश्यम” हा चित्रपट जीतू जोसेफ यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात मोहनलाल आणि मीना यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटात, आयजी गीता प्रभाकरचा मुलगा बेपत्ता होतो, त्यानंतर जॉर्ज कुट्टी (मोहनलाल) त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी धडपडतो. “दृश्यम २” हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. अजय देवगणचा बॉलीवूड चित्रपट “दृश्यम” हा चित्रपट त्याच कथेवर आधारित आहे.
मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
चित्रपटातील योगदानाबद्दल मोहनलाल यांना अलिकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. मोहनलाल यांनी हा पुरस्कार मल्याळम चित्रपटांना समर्पित केला. ते म्हणाले की, मल्याळम चित्रपटाला दशकांनंतर पुन्हा एकदा त्याची ओळख मिळाली आहे. त्यामुळे हा अभिमानाचा क्षण आहे.
मोहनलालची प्रतिक्रिया
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मोहनलाल म्हणाले, “ही मल्याळम चित्रपट उद्योगाला श्रद्धांजली आहे. २० वर्षांनंतर, हा पुरस्कार मल्याळम चित्रपट उद्योगात परत येत आहे. म्हणून, मी हा पुरस्कार मल्याळम चित्रपट उद्योगासोबत शेअर करतो. मी मल्याळम चित्रपटात माझ्यासोबत काम केलेल्या, मला घडवणाऱ्या, माझ्यातील कलाकाराला घडवणाऱ्या आणि उद्योगातील माझ्या सुंदर प्रवासाला प्रकाशमान करणाऱ्या सर्व महान कलाकारांसोबत शेअर करतो.”
Swami Samarth: स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्र विशेष भाग!
मोहनलाल यांची कारकीर्द
चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत, मोहनलाल यांनी विविध शैली आणि भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्याळम चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे मोहनलाल तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्याचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.