फोटो सौजन्य - इन्टाग्राम
नुकत्याच काही दिवसांआधी ‘प्राडा’ या इटालियन लग्झरी फॅशन हाऊसने त्यांच्या शोमध्ये ‘कोल्हापुरी’ला प्रमोट केले. परंतु ‘कोल्हापुरी’ चप्पल हे स्वतःच प्रोडक्ट असल्याचे त्यांनी सांगितले आणि गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कोल्हापूरातल्या या ‘कोल्हापुरी’ची क्रेझ जगभरात चालू आहे. परंतु प्राडानं ‘कोल्हापुरी’चे क्षेय हे मात्र कोल्हापूरला दिले नाही. हे की वर्षानुवर्षे कोल्हापुर ची शान आहे आणि त्यांचा हक्क देखील. त्यामुळे आता यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आणि आता बॉलीवूड कलाकार देखील पाठींबा देताना दिसत आहे आणि ‘कोल्हापुरी’ वर प्रेम व्यक्त करत आहे.
अभिनेत्री करिना कपूर खानने देखील प्राडा कंपनीला खोटं ठरवुन त्याला ट्रोल करत ‘कोल्हापुरी’ चप्पलचं कौतुक करताना दिसली. आणि याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आता तसेच करिनानंतर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील एक खास व्हिडिओ शेअर करत ‘कोल्हापुरी’च जगभरातील भारी पायताण असल्याचे म्हटले आहे आणि त्याच भरभरून कौतुक केलं आहे.
Hanumankind करणार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटामधून डेब्यू, कोण आहे हा प्रसिद्ध रॅपर?
नीना गुप्तांनी ‘कोल्हापुरी’सोबत एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत त्यांनी आणखी एक खास गोष्टही चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. जे ऐकून चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये कोल्हापुरी चप्पल दाखवली जी त्यांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भेट म्हणून दिली होती. त्यांचा हा खास व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. अभिनेत्याची आठवण काढत हा व्हिडीओ नीना गुप्ता यांनी शेअर करून चाहत्यांना खास किस्सा सांगून आनंदी केले आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या नीना गुप्ता?
व्हिडीओमध्ये नीना गुप्ता कोल्हापुरी चप्पल दाखवत म्हणाल्या की, ‘तर आज काल ही कोल्हापुरी चप्पल जबरदस्त चर्चेत आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत एका सिनेमात काम केलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही मला कोल्हापूरहून ही कोल्हापुरी चप्पल आणून द्याल का? तेव्हा त्यांनी लगेच हो म्हटलं होतं. त्यांनी मला ही कोल्हापुरी चप्पल आणून दिली होती. ही माझ्याकडे असेलली आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर चप्पल आहे, आणि हातानं बनवलेली…थॅंक्यू लक्ष्मीकांत…तुम्ही आमच्यासोबत आता नाही आहात, पण तुम्हाला खूप प्रेम…’ असे म्हणून नीना यांनी हा सुंदर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचं संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले “हा चित्रपट आमिर खानने केला असता तर…”
प्रिया बेर्डेने दिला प्रतिसाद
तसेच, या व्हिडीओला चाहते कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहे. तसेच अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डेने देखील या व्हिडीओला कंमेंट करून प्रतिसाद दिला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लक्ष्मीकांत बेर्डेंची ती आठवण अजूनही तुमच्या मनात कायम आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे.’ असे लिहून अभिनेत्रीने देखील भावुक होऊन या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.