(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील एक आघाडीची अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि स्टायलिश लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर तिने स्वतःला एक खास गिफ्ट दिलं आहे. नियाने ercdes Benz AMG CLE 53 ही पिवळ्या रंगाची गाडी खरेदी केली आहे. या ब्रँड मर्सिडीज कारची किंमत सुमारे दीड कोटी इतकी आहे.
ही पिवळ्या रंगाची शानदार कार नुकतीच तिच्या कलेक्शनमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, निया या कारमध्ये बसून रवि दुबे आणि सरगुन मेहता यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचली होती. मात्र त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की ही कार तिची स्वतःची आहे कार खरेदी केल्यावर नियाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. “सगळे पैसे गेले. आता EMI सुरू…”, असं मजेशीर कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. नियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निया ने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर तब्बल 12 फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नवीन कारची पूजा करताना, तसेच मर्सिडीज शोरूममध्ये आई आणि भावासोबत खास क्षण घालवताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान स्पष्ट जाणवत होता.
निया शर्माने नवी Mercedes-AMG CLE 53 खरेदी केल्यानंतर केवळ तिच्या चाहत्यांनीच नाही, तर तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिता लोखंडे, क्रिस्टल डिसूजा, अभिषेक कुमार, रीम शेख, जन्नत जुबेर, डेलनाज ईरानी, राहुल शेट्टी आणि शांतनु माहेश्वरी यांसारख्या छोट्या पडद्यावरील नामवंत कलाकारांनी नियाच्या पोस्टवर कमेंट करून तिच्या या आनंदात सहभागी होत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
निया शर्माचे कार कलेक्शन
Mercedes-AMG CLE 53 (पिवळ्या रंगाची)
Volvo XC90 SUV (ब्लॅक)
Audi Q7
Audi A4