Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

तुमची कार उन्हात किती तापते? हे कारच्या रंगावर देखील अवलंबून असते. अशातच चला जाणून घेऊयात, कोणत्या रंगाची कार उन्हात जास्त तापते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 04:39 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात
  • कोणत्या रंगाची कार सर्वाधिक तापते?
  • चला याबद्दल जाणून घेऊयात
उन्हळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या मोसमात कार एखाद्या तव्यासारख्या तापतात, ज्यामुळे साहजिकच आत बसणारे प्रवासी घामाघूम होतात. अशावेळी, कार मालकांना प्रश्न पडतो की गडद रंग त्यांच्या कारच्या बॉडीला जास्त उष्णता देतात का? या प्रश्नाचे उत्तर कारचा रंग किती सूर्यप्रकाश शोषून घेतो आणि परावर्तित करतो यावर अवलंबून असते. काळा रंग जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतो, म्हणूनच कडक सूर्यप्रकाशात पार्क केलेली काळी कार जास्त तापते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

सूर्यप्रकाश आणि रंग यांच्यात काय संबंध आहे?

सूर्यप्रकाशात काही असे किरण असतात जे आपण पाहू शकत नाही. या किरणांमुळे देखील उष्णता निर्माण करतात. काळ्या रंगाच्या कार सूर्याच्या जवळजवळ सर्व किरणांना शोषून घेतात आणि त्यांचे उष्णतेत रूपांतर करतात, ज्यामुळे गडद वस्तू लवकर गरम होतात. पांढऱ्यासारखे हलके रंग सूर्याच्या बहुतेक किरणांना परावर्तित करतात.

Car Engine Tips: ‘या’ 5 चुका आणि तुमची आवडती कार होईल बेकार! वेळीच द्या लक्ष

कारच्या आत उष्णता वाढण्याची कारणे काय?

तापलेल्या उन्हात कार उभी असताना सूर्यप्रकाश काचेच्या माध्यमातून आत येतो आणि डॅशबोर्ड तसेच सीट्स गरम करतो. ही उष्णता कारच्या केबिनमध्ये अडकून राहते, त्यामुळे आतले तापमान झपाट्याने वाढते. काही संशोधनानुसार, जर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दोन कार उन्हात उभ्या असतील, तर काळ्या रंगाच्या कारमधील तापमान पांढऱ्या कारपेक्षा काही अंशांनी जास्त असू शकते.

इंटीरियरचा प्रभाव

कारच्या बाहेरील रंगाइतकाच, कधी कधी त्यापेक्षा जास्त परिणाम कारच्या इंटीरियरच्या रंगाचा होतो. जर डॅशबोर्ड आणि सीट्स गडद किंवा काळ्या रंगाच्या असतील तर त्या उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतात आणि केबिन जास्त वेळ गरम राहतो. उलट, हलक्या रंगाचे इंटीरियर सूर्यप्रकाश कमी शोषते, त्यामुळे कारमध्ये बसल्यावर उष्णता तुलनेने कमी जाणवते.

उष्णता कमी करण्यासाठीची सुविधा

कारच्या आतील तापमान कमी ठेवण्यासाठी टिंटेड ग्लास आणि सनशेडसारख्या सुविधा उपयोगी ठरतात. या गोष्टी खिडक्यांमधून येणारा थेट सूर्यप्रकाश कमी करतात. याशिवाय, काही कारमध्ये वेंटिलेटेड सीट्स दिलेल्या असतात ज्यामध्ये लहान छिद्रे असतात. त्यातून हवा फिरत राहते आणि पाठीला घाम येण्याची शक्यता कमी होते. तसेच, चांगली एअर कंडिशनिंग सिस्टम केबिनमधील उष्णता लवकर बाहेर काढण्यास मदत करते.

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

जास्त फरक पडत नाही

तीव्र उन्हाळ्यात काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कारच्या आतल्या तापमानात काही अंशांचा फरक स्पष्ट दिसू शकतो. मात्र, जर दोन्ही कार बराच वेळ कडक उन्हात उभ्या राहिल्या तर दोन्हींचे केबिन खूप गरम होतात. अशा परिस्थितीत रंगापेक्षा जास्त फरक पडत नाही, कारण उष्णता हळूहळू संपूर्ण कारमध्ये पसरते.

यापासून कसा बचाव कसा करता येईल?

कारचा रंग निवडण्यापेक्षा शक्यतो कार सावलीत पार्क करणे अधिक फायदेशीर ठरते, त्यामुळे केबिनचे तापमान कमी राहते. तसेच, कारच्या काचांवर रिफ्लेक्टिव्ह कव्हर लावल्यास सूर्यप्रकाश आत येण्यापासून बऱ्याच प्रमाणात अडथळा निर्माण होतो. जर तुम्ही अतिशय उष्ण हवामान असलेल्या भागात राहत असाल, तर पांढरा किंवा हलक्या रंगाची कार निवडणे अधिक सोयीचे ठरू शकते.

Web Title: Black vs white car what color car gets hot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Car
  • Summer

संबंधित बातम्या

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट
1

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट

माणसांची जागा ‘ते’ घेणार! BMW कारखान्यांमध्ये ‘ह्युमनॉइड रोबोट्स’ तैनात; ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या क्रांतीमागील नेमके कारण काय?
2

माणसांची जागा ‘ते’ घेणार! BMW कारखान्यांमध्ये ‘ह्युमनॉइड रोबोट्स’ तैनात; ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या क्रांतीमागील नेमके कारण काय?

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी
3

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?
4

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.