Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूडच्या अभिनेत्याने ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस’चा अवॉर्ड मिळवत रचला होता इतिहास, फ्रान्समध्ये दुमदुमला होता टाळ्यांचा आवाज!

Nirmal Pandey हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि दमदार अभिनेते होते. कारकिर्दीतील सर्वात खास क्षण ठरला तो Daayraa चित्रपट. या चित्रपटातील तृतीयपंथीय भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 07:39 PM
nirmal pandey

nirmal pandey

Follow Us
Follow Us:
  • ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार मिळवणारा एकमेव पुरुष कलाकार
  • कोणत्या व्यक्तिरेखेसाठी मिळाला होता पुरस्कार
  • अष्टपैलू कलाकाराची कशी झाली एक्झिट?
Actor received the best actress award: अनेकदा सिनेसृष्टीतील कलाकारांच्या नावापेक्षा त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून जातात. अशा भूमिका त्यांना जगभरात अशी ओळख मिळवून देतात, की त्यानंतर लोक त्या कलाकाराचं खरं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होतात. असाच एक सितारा ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर जगात आपलं नाव कमावलं. आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी एक अढळ स्थान निर्माण केले होते. असा रंगभूमीवरील एक चमकता सितारा म्हणजे निर्मल पांडे. भूमिका रुपेरी पडद्यावरची असो वा छोट्या पडद्यावरची, निर्मल पांडे नेहमी आपल्या भूमिकेला न्याय द्यायचे.

उत्तराखंडच्या नैनितालपासून निर्मल पांडेंची सुरुवात

निर्मल पांडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९६२ रोजी उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात झाला होता. त्यांचे खरे नाव राजकुमार पांडे होते. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. शाळा आणि मोहल्ल्यात होणाऱ्या रामलीला तसेच नाटकांमध्ये ते नेहमी उत्साहाने सहभागी व्हायचे. अल्मोडा आणि नैनितालमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्लीची वाट धरली.

निर्मल पांडेंना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार

निर्मल पांडे यांचा दायरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या भूमिकेने सगळ्यांचा मनावर छाप पाडली.
‘१९९७ मध्ये फ्रान्समधील ‘वॅलेन्सिएन्स फिल्म फेस्टिव्हल’ (Valenciennes Film Festival) मध्ये तर निर्मल पांडे यांना ‘दायरा’ चित्रपटातील त्यांच्या तृतीयपंथीय (किन्नर) भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट झाला होता. चित्रपटसृष्टीतील ते एकमेव असे पुरुष कलाकार होते, ज्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

एनएसडी (NSD) मधून अभिनयाचे धडे गिरवले

दिल्लीत आल्यानंतर निर्मल पांडे यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या रीतसर शिक्षणाला सुरुवात झाली. एनएसडीमध्ये त्यांनी थिएटर आणि अभिनयातील बारकावे अतिशय गांभीर्याने आत्मसात केले. या काळात त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर नाटकांचे दिग्दर्शनही करायला सुरुवात केली. रंगमंचावर आपली कला सादर करत असतानाच त्यांनी आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची सांगड घातली.

शेखर कपूर यांचा ‘बँडिट क्वीन’ चित्रपट

चित्रपटसृष्टीत त्यांना पहिली मोठी ओळख शेखर कपूर यांच्या ‘बँडिट क्वीन’ चित्रपटामुळे मिळाली. यामध्ये त्यांनी ‘विक्रम मल्लाह’ची भूमिका साकारली होती, जी फूलन देवी यांच्या पतीच्या रूपात प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या यशानंतर त्यांच्याकडे चित्रपटांच्या अनेक ऑफर्स आल्या. यामध्ये ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘इस रात की सुबह नहीं’, ‘हम तुम पे मरते हैं’, ‘लैला’, ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘शिकारी’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा यात समावेश होता.

संघर्षाने भरलेले जीवन, अकाली निधन

निर्मल पांडे यांनी केवळ चित्रपटातच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही स्वतःचा ठसा उमटवला. त्यांनी ‘हातिम’ आणि ‘प्रिन्सेस डॉली और उसका मॅजिक बॅग’ सारख्या मालिकांमध्ये खलनायकाची प्रभावी भूमिका साकारली. निर्मल पांडे यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. गाझियाबादमध्ये त्यांची ‘फ्रेश टॅलेंट अकॅडमी’ नावाची एक ॲक्टिंग इन्स्टिट्यूट होती, जिथे ते थिएटर वर्कशॉप्स घ्यायचे. दुर्दैवाने, १८ फेब्रुवारी २०१० रोजी वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Web Title: Nirmal pandey the only actor in the industry who received the best actress award carved a niche for herself globally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood
  • Bollywood Film

संबंधित बातम्या

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!
1

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
2

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा
3

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव
4

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.