Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा! कॉकटेलमध्ये जिवंत मासा…; संजय दत्तच्या ‘या’ रेस्टॉरंटमधील वादग्रस्त कॉकटेल बंद, नेमकं काय प्रकरण?

संजय दत्तने काही दिवसांपूर्वी या कॉकटेलची एक जाहिरात पोस्ट केली होती, ज्यामध्ये कॉकटेलमध्ये एक जिवंत मासा आणि त्याच्यावर पेटलेली आग दाखवण्यात आली होती. विरोध झाल्यानंतर आता हे कॉकटेल बंद करण्यात आले आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 03, 2026 | 02:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्य रेस्टॉरंट – बार मुळे चर्चेत आहे. हा वाद फिश कॉकटेल वरून निर्माण झाला होता. वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्या रेस्टॉरंट-बारच्या मेन्यूमधून ‘लाइव्ह फिश कॉकटेल’ काढून टाकले आहे. हा बार संजय आणि अभिमन्यू जाखर यांची भागीदारी आहे. दत्तने काही दिवसांपूर्वी या कॉकटेलची एक जाहिरात पोस्ट केली होती, ज्यामध्ये कॉकटेलमध्ये एक जिवंत मासा आणि त्याच्यावर पेटलेली आग दाखवण्यात आली होती. त्याच्या पोस्टवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. प्राणी कल्याण कार्यकर्त्यांनीही या पेयाविरोधात आवाज उठवला. हे पेय रेस्टॉरंटच्या मेन्यूमधून काढून टाकण्यात आले आहे

संजय दत्तने मार्च महिन्यात त्याचा मित्र अभिमन्यू जाखरसोबत ‘अल्ता स्टेला’ नावाचे रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर मेन्यू, खाद्यपदार्थ आणि पेयांविषयी असंख्य पोस्ट्स आहेत. दत्तने तर एका पेयामध्ये तरंगणाऱ्या जिवंत माशाचा आणि त्याच्या वर लागलेल्या आगीचा फोटो असलेली एक पोस्टसुद्धा टाकली होती. ही पोस्ट व्हायरल होताच, अनेक लोकांनी आक्षेप घेतला. आता रेस्टॉरंटने आपल्या मेन्यूमधून ते पेय काढून टाकले असून, त्यासंबंधीची एक पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे होत नाही. आम्ही ही बाब गांभीर्याने घेतो. हे आमचे सुधारण्याचे प्रयत्न आहेत.’ पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, ‘व्यक्त होत असलेल्या चिंतांचे आम्ही स्वागत करतो, आम्ही नेहमीच प्राणी संरक्षणाला गांभीर्याने घेतले आहे. एबियस कॉकटेल हे मीन राशीपासून प्रेरित होते. बेट्टा माशांना फायटर फिश म्हणूनही ओळखले जाते. हे मासे एकटे राहतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावरून श्वास घेऊ शकतात, म्हणूनच त्यांना एकटे ठेवले जाते.’ पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, कॉकटेलमध्ये जिवंत मासे वापरण्याबद्दल चिंता व्यक्त करणे ही एक योग्य चिंता आहे.त्यामुळे, हे पेय यापुढे दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.


संजय दत्तने ११ मार्च रोजी हे पोस्ट केले. यातून ‘अल्ता स्टेला’ची जाहिरात झाली. अनेक लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की कॉकटेल ग्लासमधून जिवंत मासे काढून टाकावेत. एकाने लिहिले, “सजावटीसाठी जिवंत मासे? हे कोणालाही नको आहे. क्रूरतेला प्रोत्साहन देणे थांबवा.”


‘धुरंधर’ या चित्रपटात संजय दत्तची एक महत्त्वाची भूमिका आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागातील त्याची चौधरी अस्लमची भूमिका खूप गाजली होती. अलीकडेच, ‘केडी द डेव्हिल’मधील एका गाण्यावरून त्याचे नाव वादात सापडले होते. नोरा या वादानंतर, हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले.

Web Title: Oh god a live fish in a cocktail controversial cocktail at sanjay dutts restaurant discontinued what exactly is the issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Bollywood News
  • hotel
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?
1

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता
2

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट
3

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं
4

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.