(फोटो सौजन्य-Social Media)
कॉमेडी एंटरटेनर ‘फुक्रे 3’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त, पुलकित सम्राट लाडक्या फ्रँचायझीच्या प्रवासाबद्दल भावूक झाला आहे. एक्सेल एंटरटेनमेंट द्वारे निर्मित, हा चित्रपट ‘फुक्रे’ मालिकेचा तिसरा भाग आहे, ज्यामध्ये पुलकितने त्याच्या प्रिय हनीची भूमिका पुन्हा केली आहे. हा प्रसंग साजरा करण्यासाठी, पुलकितने त्याच्या फुक्रे गँगसोबतचा पडद्यामागचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, “फुक्रे गँगसोबत हनिमूनची एक झलक! Fukrey3 चे एक वर्ष साजरे करत आहे! पूर्वीसारखेच वाटते आहे सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद!!” असे लिहून अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पुलकितने त्याच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले, ज्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे हनी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक बनला. त्याच्या अतुलनीय ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुलकितने या व्यक्तिरेखेतील त्याच्या अनोख्या करिष्माने हनीला देशाचे आवडते पात्र बनवले. त्याच्या चमकदार कॉमिक टाइमिंगने तरुण आणि सामान्य लोक दोघांच्याही मनाला भिडले आणि अनेकांच्या हृदयात त्याला विशेष स्थान मिळवून दिले. अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी देखील कंमेंट करून चांगला प्रतिसाद दिला आहे.
हे देखील वाचा- ‘धर्मवीर २’ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई
या चित्रपटात वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, अली फजल आणि मनजोत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फुक्रे फ्रँचायझी पुलकितसाठी वाढीचे व्यासपीठ आहे, ज्यामुळे त्याला एक अभिनेता म्हणून एक वेगळे स्थान मिळाले आहे. आणि हलक्या-फुलक्या मनोरंजनाने प्रेक्षकांची मने जिंकता येतात हे अभिनेत्याने सिद्ध केले आहे.