(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा अलीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. मात्र गणेशोत्सवाच्या दिवशी हे दोघं एकत्र लोकांसमोर आले आणि “सर्व काही ठीक आहे” असा स्पष्ट संदेश दिला. अलीकडेच कलर्सच्या ‘पती पत्नी और पंगा – जोडीयों का रिअॅलिटी चेक’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली.सुनीता ने विनोदाने पती गोविंदाचे एक गुपित सांगितले.
सुनीताने ऑन एअरमध्ये खुलासा केला की गोविंदाने जवळजवळ प्रत्येक नायिकेसोबत फ्लर्ट केलं आहे, परंतु सोनाली बेंद्रेला सोडले आहे.हा खुलासा ऐकून सोनाली स्वतः लाजते. इतकेच नाही तर सुनीताने गोविंदाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक मनोरंजक किस्से शेअर केले, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आणि ते हसायला लागले.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर वरुण तेज आणि लावण्या झाले आई- बाबा; कोनिडेला कुटुंबात गोंडस बाळाचा जन्म
शोचे होस्ट मुनावर फारूकी सुनीता आहुजा यांना शोमध्ये डान्स करण्यासाठी बोलावतो आणि दोघे बीबी नंबर वन या गाण्यावर डान्स करताना दिसतात. तेव्हा सुनीता म्हणाली, “मी तुझी बीबी नंबर 1 नाहीये की तू माझ्यासोबत असा नाचत आहेस. मी तर गोविंदाची बीबी नंबर 1 आहे.
गोविंदाच्या गाण्यांवर सुनीता नाचते
सोनाली, सुनीता आणि स्पर्धकांनी “मैं तो रास्ते से जा रहा था” या गाण्यावर डॉन्स केला. विनोदात भर घालत सुदेश लाहिरी स्टँडीमागे लपला. त्याने गोविंदाची नक्कल केली आणि अभिषेक कुमारला एक मजेदार थप्पड मारली, ज्यामुळे शोमध्ये गंमतीशीर वातावरण झाले होते.
सुनीता आहुजाने गोविंदाला रेटिंग दिले
शोमध्ये ईशा मालवीयाने सुनीताला तिच्या पतीला रेटिंग देण्यास सांगितले. यावेळी गोविंदाने पत्नी सुनीताला ७ गुण दिले. खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा सुनीताने त्याच्या चेष्ठेला रेटिंग दिले. तर लगेच सुनीताने खोडकरपणे अभिनेत्याला ६ गुण दिले, म्हणत पुन्हा सगळ्यांना हसवलं
सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या
काही काळापूर्वी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा पसरल्या होत्या. अभिनेत्याचे वकील आणि व्यवस्थापक यांनी सांगितले की त्या जुन्या गोष्टी आहेत आणि गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात आता सर्व काही ठीक आहे. यानंतर, गणेश उत्सवादरम्यान हे जोडपे एकत्र दिसले.