Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! युरोपमध्ये रंगणार ‘मराठी नाट्यकले’चा जागर; जगभरातील १४ एकांकिकांचे…

अभिमंच गेली ७–८ वर्षे नाट्यकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक एकांकिका आणि दोन अंकांचे मराठी तसेच हिंदी नाट्यप्रयोग नेदरलँड्समध्ये अभिमंचने यशस्वीरित्या सादर केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 06:03 PM
अभिमानास्पद! युरोपमध्ये रंगणार 'मराठी नाट्यकले'चा जागर; जगभरातील १४ एकांकिकांचे...

अभिमानास्पद! युरोपमध्ये रंगणार 'मराठी नाट्यकले'चा जागर; जगभरातील १४ एकांकिकांचे...

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध भाग
मराठी रंगभूमीचे पडसाद युरोपमध्ये उमटणार
नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा होणार

मुंबई: मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा (Entertainment) अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत प्रभावी नाट्यचळवळींपैकी एक म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. या महान परंपरेचा वारसा लाभलेल्या मराठी रंगभूमीचे पडसाद आता युरोपमध्येही उमटू लागले आहेत. याच नाट्यप्रेमाने आणि आपल्याला लाभलेल्या नाट्यकलेच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी नेदरलँड्स येथे युरोपमधील पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंच थिएटरतर्फे आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि नेदरलँड्समधूनही उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे. या २ दिवसांमध्ये तब्बल १४ एकांकांची मेजवानी नाट्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. सर्व टीममध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सर्व कलाकारांनी उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमी माननीय विजय केंकरे यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने हे या स्पर्धेच्या परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत.

‘द 50’मधून निक्की तांबोळी आऊट, शोमध्ये मोठा ट्विस्ट; एलिमिनेशनने फॅन्सना धक्का

या एकांकिका स्पर्धेविषयी बोलताना अभिमंच थिएटरचे संस्थापक मिलिंद चव्हाण, प्रसाद सावंत आणि अमोल कोर्डे म्हणाले की , परदेशात वास्तव्यास असलेला मराठी समाज आपल्या भाषा, संस्कृती आणि कलेशी घट्ट नाते जपत आहे. त्याचाच एक भाग म्हणून युरोपमध्ये मराठी नाट्यकलेचा जागर घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही अभिमंच थिएटरच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. एकांकिका स्पर्धा या नेहमीच नाट्यरसिकांसाठी तसेच होतकरू कलाकारांसाठी एक महत्त्वाच व्यासपीठ ठरल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या एकांकिकांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, अभिमंच गेली ७–८ वर्षे नाट्यकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक एकांकिका आणि दोन अंकांचे मराठी तसेच हिंदी नाट्यप्रयोग नेदरलँड्समध्ये अभिमंचने यशस्वीरित्या सादर केले आहेत, आणि नाट्यप्रेमींनी या प्रयोगांना नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला आहे.

‘मला धर्म बदलायचा… ‘, कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले, वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

या स्पर्धेत विजयी ठरलेल्या पहिल्या तीन एकांकिकांना स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा विविध गटातील सात विजेत्यांनाही पुरस्कार मिळणार आहे. मराठी रंगभूमीची परंपरा जपत, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळे युरोपमधील नव्या पिढीला मराठी नाट्यकलेशी जोडण्याची संधी मिळणार असून, मराठी संस्कृतीचा ठसा अधिक ठळकपणे उमटणार आहे.

Web Title: 14 marathi theater plays to be presented in netherlands europe entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Nedarland
  • Plays

संबंधित बातम्या

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा
1

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.