(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
तेलंगणातील बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात स्टार्सच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने समन्स बजावल्यानंतर बुधवारी सुपरस्टार राणा दग्गुबाती या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार होते, परंतु अभिनेता यावेळी हजर राहिला नाही. आता ईडीने त्याला ११ ऑगस्ट रोजी पुन्हा बोलावले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण आता जाणून घेणार आहोत.
अभिनेता स्वप्निल जोशीच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
या प्रकरणात केवळ राणा दग्गुबातीच नाही तर टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध नावांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने या आठवड्यात चार स्टार्सना समन्स बजावले आहेत, ज्यात ३० जुलै रोजी अभिनेता प्रकाश राज, ६ ऑगस्ट रोजी विजय देवरकोंडा आणि १३ ऑगस्ट रोजी लक्ष्मी मंचू यांचा समावेश आहे. ईडीच्या चौकशीचे लक्ष काही ऑनलाइन बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या या कलाकारांवर आहे. या ॲप्सवर बेकायदेशीर बेटिंगद्वारे कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर कमाई केल्याचा आरोप आहे.
प्रमोशनच्या बहाण्याने लाखो रुपयांचे व्यवहार झाले
सूत्रांच्या माहितीनुसार, काही प्रसिद्ध अभिनेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना या अॅप्सचा प्रचार करण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली होती. तसेच, या स्टार्सचा दावा आहे की त्यांना या प्लॅटफॉर्मच्या खऱ्या कामाची माहिती नव्हती आणि ते फक्त ब्रँड प्रमोशन म्हणून त्याच्याशी जोडले गेले होते. तेलंगणा पोलिसांनी नोंदवलेल्या पाच एफआयआरच्या आधारे ईडीने हा खटला सुरू केला आहे. एजन्सी आता या कलाकारांचे जबाब नोंदवेल आहे. जे मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत (पीएमएलए) कायदेशीर कागदपत्रे म्हणून मानले जातील.
Karuppu चा टीझर पाहून चाहत्यांना आली ‘गजनी’ची आठवण, अभिनेता सूर्या दिसला ॲक्शन मोडमध्ये
नियम आणि कायदे काय म्हणतात?
मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे पांढरे करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे प्रमोट करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये, केवळ आर्थिक दंडच नाही तर अटक देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या अश्याच ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेते अडकले आहेत.
राणा यांना पुन्हा ११ ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आले
आता राणा दग्गुबाती ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना नवीन तारखेसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. आता त्यांना ११ ऑगस्ट रोजी पुन्हा बोलावण्यात आले आहे. आता ११ ऑगस्ट रोजी ईडीसमोर त्यांची उपस्थिती आणि त्यांचे म्हणणे या प्रकरणात कोणते वळण घेते हे पाहणे बाकी आहे. त्याच वेळी, ईडीची चौकशी आता इतर प्रवर्तक आणि संबंधित कंपन्यांपर्यंत देखील वाढू शकते.