Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट; Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाली Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवि दुबे लवकरच मोठ्या बिग बजेट बॉलीवूड चित्रपट रामायणमध्ये दिसणार आहे. लक्ष्मण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याला हा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • लखनौच्या लक्ष्मण मंदिरातील दर्शन ठरलं टर्निंग पॉइंट
  • Ravi Dubey ला वर्षभरातच मिळाला मोठा प्रोजेक्ट
  • Ramayana मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणार
 

भव्य आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका साकारण्यापूर्वी घडलेला एक विलक्षण योगायोग अभिनेता रवि दुबे यांनी नुकताच उलगडला केला आहे. कास्टिंग निश्चित होण्याच्या साधारण वर्षभर आधी लखनौमध्ये शूटिंगदरम्यान अभिनेता लक्ष्मण मंदिरात गेले असल्याचे सांगितले आहे. आणि नेमकं त्यानंतर वर्षभराने त्यांच्याच वाट्याला लक्ष्मणाची भूमिका मिळाली.

रवि दुबे हे भारतीय मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. शिवाय ‘ड्रीमियाटा एंटरटेनमेंट’ या बॅनरअंतर्गत त्यांनी यशस्वी निर्मात्याची भूमिकाही निभावली आहे. आता ते दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’मध्ये लक्ष्मण साकारताना दिसणार आहेत. या पौराणिक कथानकात रणबीर कपूर रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Bigg Boss Marathi 6: राखीचा नवा ड्रामा, राकेशच्या वागण्याने केसच कापले; हादरले संपूर्ण घर, काय होणार परिणाम

रवि यांनी सांगितले, “चित्रपटासाठी लॉक होण्याच्या सुमारे वर्षभर आधी मी लखनौमध्ये गुरिल्ला शूट करत होतो. एका सीनमध्ये मी बाईक चालवत होतो आणि माझी हिरोईन मागे बसली होती. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावर आम्ही पुढच्या सूचनांची वाट पाहत थांबलो. तेव्हा मागे वळून पाहिलं तर तिथे लक्ष्मणजींचं मंदिर दिसलं.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मला आधी कधीच माहीत नव्हतं की तिथे असं मंदिर आहे. तेव्हा लक्षात आलं की लखनौला पूर्वी ‘लक्ष्मणपुरी’ म्हटलं जायचं. कथेनुसार, भगवान श्रीरामांनी लक्ष्मणांना हे स्थान दिलं होतं. मला मंदिरात जावंसं वाटलं. मी आत जाऊन राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या त्रिमूर्तीचं दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि त्या क्षणाचा फोटो काढून ठेवला.” विशेष म्हणजे, त्या काळात ते ज्या मालिकेचं शूटिंग करत होते, त्यातील त्यांच्या पात्राचं नाव ‘लखन’ होतं, आणि त्या शोचं नावही ‘लखन लीला भार्गव’ असं होतं.

रवि म्हणाले, “हे सगळे अद्भुत योगायोग होते. आणि जेव्हा मला चित्रपटासाठी अधिकृतपणे निवडल्याची बातमी मिळाली, तेव्हा मंदिरातील तो फोटो माझ्या डोळ्यांसमोर तरळला. मला जाणवलं की ही घटना मी पूर्णपणे विसरलो होतो. नेमकं जवळपास एक वर्षानंतर, त्याच मंदिराच्या दर्शनानंतर मला लक्ष्मणाची भूमिका मिळाली.”

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा

निर्माते नमिथ मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज निर्मितीत, तसेच ८ वेळा ऑस्कर विजेत्या डीएनईजी आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन यांच्या सहकार्याने साकारत असलेला हा दोन भागांतील भव्य चित्रपट आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आता रवि दुबे यांना मोठ्या पडद्यावर शूर, निष्ठावान आणि सामर्थ्यवान लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा योगायोग केवळ एका कलाकाराच्या प्रवासाची कथा नाही, तर श्रद्धा, संयोग आणि नियती यांच्या अनोख्या संगमाचीही कहाणी आहे.

Web Title: Ravi dubey speaks about how he gets role of laxman in nitesh tiwari ramayana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ramayana

संबंधित बातम्या

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग
1

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

‘डॉन 3’ वादावर सलमान खानचा हस्तक्षेप; रणवीर–फरहान वाद मिटणार का?
2

‘डॉन 3’ वादावर सलमान खानचा हस्तक्षेप; रणवीर–फरहान वाद मिटणार का?

“माझी हत्या करण्याचा प्रयत्न…”, परवीन बाबी-Amitabh Bachchan वाद पुन्हा चर्चेत; Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ
3

“माझी हत्या करण्याचा प्रयत्न…”, परवीन बाबी-Amitabh Bachchan वाद पुन्हा चर्चेत; Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!
4

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.