
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा नवीन चित्रपट “धुरंधर” प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला सापडला आहे. अशोक चक्र पुरस्कार विजेते शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, ज्यामध्ये चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की हा चित्रपट त्यांच्या मुलाच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसते आणि चित्रपट निर्मात्यांनी यासाठी त्यांच्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या याचिकेत माहिती आणि प्रसारण मंत्रालय (MIB), सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC), भारतीय लष्कर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना पक्षकार करण्यात आले आहे.
धुरंधर एका सत्य घटनेवर प्रेरित
‘धुरंधर’ चित्रपटाच्या ट्रेलरवरून असे दिसून येते की चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तान गुप्तचर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्यात दहशतवादविरोधी केलेली कारवाई आणि गुप्तचर कारवाया दाखवल्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांनी जाहीरपणे सांगितले आहे की हा चित्रपट एका वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंग पाकिस्तानमधील एका गुप्तहेराची किंवा भारतीय लष्कराच्या सैनिकाची भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. मेजर मोहित शर्माच्या पालकांनी दावा केला आहे की ही कथा त्यांच्या मुलाच्या जीवनापासून प्रेरित आहे.
‘धुरंधर’ मधील स्टार कास्ट
धुरंधर हा चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित करत आहे आणि त्यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. सारा अर्जुन त्याच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. धुरंधरमध्ये संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. परंतु, चित्रपटातील रणवीर सिंगचा लूक व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा अंदाज लावण्यास सुरुवात केली की तो शहीद मेजर मोहित शर्माची भूमिका साकारत आहे.
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येचा मोठा खुलासा, Ex बॉयफ्रेंड 9 वर्षांनंतर उघड केले सत्य
शहीद मेजर मोहित शर्मा कोण आहे?
मेजर मोहित शर्मा यांनी ‘इफ्तिखार भट्ट’ या उर्फ हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी गटात घुसखोरी केल्याची माहिती आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ते शहीद झाले. मोहित शर्मा त्यांच्या गुप्त कारवायांसाठी ओळखले जातात.