Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

झी स्टुडिओज निर्मित आता लवकरच आणखी एक मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ज्याचे नाव आहे 'तुंबाडची मंजुळा'. या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. जे पाहून चाहते चकीत झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 02, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • झी स्टुडिओजच्या नव्या चित्रपटाची घोषणा
  • ‘तुंबाडची मंजुळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
  • प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित
 

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो निसर्गरम्य सागरकिनारा, हिरवाईनं नटलेली गावं आणि पिढ्यान् पिढ्या सांगितल्या जाणाऱ्या गूढ-रहस्यमय कथा. भुताखेतांच्या गोष्टी, गावाकडच्या गप्पा आणि थोड्याशा घटनेला रंगतदार वळण देण्याची परंपरा या सगळ्या वातावरणाला साजेशी एक रंजक कथा आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाचं आगळं-वेगळं मोशन पोस्टर होळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अर्धवट उघड्या दाराआड दिसणारा गूढ चेहरा आणि दाराच्या कवाडांत अडकलेले हात जणू काहीतरी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत असं चित्र दाखवणाऱ्या या पोस्टरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.

प्लेबॅक सिंगिंगनंतर Arijit Singh चं दमदार पुनरागमन; पहिलं इंडिपेंडंट गाणं ‘Raina’ ठरलं सुपरहिट!

हा चित्रपट येत्या ५ जून रोजी, जागतिक पर्यावरण दिनी, प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असून विविध कोरगावकर यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मितीची धुरा उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील कलाकार, कथानक आणि ‘मंजुळा’ नेमकी कोण आहे, हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.

 

याबाबत बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “मराठी प्रेक्षक आधुनिक विचारांचा असला तरी आपल्या मातीशी घट्ट जोडलेला आहे. गावकथांमधील भावविश्व त्याला नेहमीच भावतं. ‘दशावतार’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील प्रेक्षकांना एक वेगळा, गावाकडचा अनुभव देणारा चित्रपट ठरेल. हळूहळू चित्रपटासंबंधित अधिक माहिती जाहीर करण्यात येईल.” असे त्यांनी म्हटले आहे.

Dhurandhar The Revenge चा ट्रेलर होळीच्या मुहूर्तावर होणार रिलीज; निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज

तसेच ते पुढे म्हणाले, ‘मागील वर्षी आम्ही आणलेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण. ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. सध्या या चित्रपटाचं टीझर पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे. हळूहळू यातील इतर बाबी आम्ही प्रसिद्ध करू ज्यातून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतच जाईल हे मात्र नक्की. यानिमित्ताने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आम्ही घेऊन आलो आहोत याचा विशेष आनंद आहे.’ पहिल्याच पोस्टरपासून चर्चेत आलेला ‘तुंबाडची मंजुळा’ ५ जून रोजी प्रदर्शित होणार असून, या गूढ कथेचा उलगडा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: Tumbadchi manjula marathi movie motion poster release 5 june movie release in theater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
1

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
2

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य
3

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.