
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट “धुरंधर” आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. परंतु चित्रपटाचा शेवट एक मोठे आश्चर्यचकित करणारा आहे. निर्मात्यांनी शेवटी “धुरंधर” चा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची घोषणाही केली आहे. “धुरंधर” चा सिक्वेल “रिव्हेंज” पुढील वर्षी १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातच दुसऱ्या भागाची घोषणा केल्यामुळे चाहते आणखी उत्साहित झाले आहेत.
मालती चहर घरा बाहेर पडताच प्रणित मोरेला अश्रू अनावर; Bigg Boss 19 ला मिळाले 5 Finalist
“धुरंधर” चित्रपटाची आधीपासून चर्चा
“धुरंधर” चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अशा अफवा पसरल्या होत्या की चित्रपटाची कथा पुढील भागातही सुरू राहील. परंतु, त्यावेळी काहीही निश्चित झाले नव्हते. परंतु आता, निर्मात्यांनी “धुरंधर” चित्रपटाच्या शेवटी चित्रपटाचा दुसरा भाग “रिव्हेंज” जाहीर केला आहे. त्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. आता, दुसऱ्या भागात कथा कशी पुढे जाते तसेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये कोणते बदल होतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्रेक्षकांना सर्वांचे काम खूप आवडत आहे
‘धुरंधर’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. चित्रपट विश्लेषकांनाही मोठी सुरुवात अपेक्षित आहे आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटामधील सगळ्यांच कलाकारांच्या कामाचे कौतुक करत आहेत. परंतु, अक्षय खन्ना उर्वरित कलाकारांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे दिसून येत आहे, तर रणवीर सिंगच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. परंतु, चित्रपटाची तीन तासांपेक्षा जास्त लांबी प्रेक्षकांना त्रास देत आहे, ज्यामुळे अनेकजण चित्रपटाला ट्रोल करत आहेत.
‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये,’ टॅगलाईनसह ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित; रिंकूची लक्षवेधी भूमिका!
हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित
आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” हा एक गुप्तचर-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे आणि भारतात घडलेल्या विविध घटनांचे चित्रण करणारा हा चित्रपट आहे. रणवीर सिंग व्यतिरिक्त, या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात दमदार संवाद, पूर्ण ॲक्शन आणि रोमान्सचा अनुभव पाहायला मिळणार आहे. तसेच “रिव्हेंज” या चित्रपटाचा दुसरा भाग नवीन वर्षात १९ मार्च २०२६ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.