(फोटो सौजन्य - x अकाउंट)
रॅपर बादशाहसाठी ही सकाळ समस्यांनी भरलेली होती. चंदीगडमध्ये असलेल्या सिंगरच्या दोन क्लबमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट देशी बनावटीच्या बॉम्बने करण्यात आले. सध्या घटनास्थळी पोहोचलेले पथक प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास करत आहे.
वैयक्तिक अडचणींमुळे बॉम्बस्फोट घडवून आणले होते का?
एएनआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या वृत्तानुसार, चंदीगड पोलिसांनी मीडियाशी बोलताना ही वैयक्तिक समस्या असल्याचे वर्णन केले आहे. खंडणीसह घटनेमागील इतर संभाव्य कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत डीएसपी दिलबाग सिंह धालीवाल सांगतात की, ‘आम्हाला नियंत्रण कक्षात माहिती मिळाली की येथे काही वैयक्तिक समस्या आहेत.’ असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ‘येथे काच फुटल्याचे आमच्या तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. सध्या आम्ही काही सांगू शकत नाही. फॉरेन्सिक टीम आली आहे. आम्ही नुकतीच एफआयआर दाखल केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.’ असे त्यांनी सांगितले.
स्फोटाबद्दल लोक काय म्हणाले?
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये क्लबच्या बाहेर तुटलेले काचे दिसत आहेत. क्लबमध्ये काम करणाऱ्या पुरनने सांगितले की, ‘स्फोटाचा आवाज ऐकून तो बाहेर आला होता, त्यानंतर त्याला खिडकीची काच जमिनीवर पडलेली दिसली. स्फोट झाला तेव्हा आत 7 ते 8 लोक उपस्थित होते.’ असे त्याने सांगितले. चंदिगडच्या सेक्टर-26 मध्ये हा सिंगर्स क्लब आहे. प्रसिद्ध बारला लक्ष्य केल्याच्या घटनेने स्थानिकांना चांगलाच धक्का बसला आहे.
#WATCH | A suspicious explosion took place at De’Orra – Alehouse & Kitchen restaurant in Sector 26, Chandigarh
More details awaited. pic.twitter.com/AEINenqgSl
— ANI (@ANI) November 26, 2024
मोहिनी डे एआर रहमानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली स्पष्ट, सोशल मीडियावरील पोस्टने वेधले लक्ष!
बॉम्ब बनवण्यासाठी ज्यूटची दोरी वापरण्यात आली होती
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्लबच्या बाहेर सापडलेल्या ज्यूटच्या तुकड्यांवरून संशयितांनी दहशत पसरवण्यासाठी सुतळी (ज्यूट दोरी) वापरून देशी बनावटीचा बॉम्ब बनवला असावा. असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट मालकांना घाबरवण्यासाठी होता आणि यामागे खंडणीचा हेतू असावा असा पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे.