दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्यात ‘इफ्फी’ महोत्सवाची धामधूम सुरू आहे. ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांसह जगभरातील कलकारांना आणि दिग्दर्शकांना आशयपूर्ण सिनेमे पाहायला मिळतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, NFDC आणि ESG च्या सहकार्याने, २० ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान गोव्यात ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)आयोजित करण्यात येणार आहे.
IFFI 2024 Ashutosh Gowariker Joined By Jury Members
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्यात ‘इफ्फी’ महोत्सवाची धामधूम सुरू आहे. ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांसह जगभरातील कलकारांना आणि दिग्दर्शकांना आशयपूर्ण सिनेमे पाहायला मिळतात.
हा महोत्सव केवळ चित्रपट प्रेक्षकांसाठीच नाही, तर नव्या पिढीतील कलाकार, दिग्दर्शक आणि लेखकांसाठीही प्रेरणादायी मंच ठरतोय. सध्या इंडस्ट्रीमध्ये आघाडीचे असलेल्या सिनेकर्त्यांकडून कलाकार, दिग्दर्शक आणि लेखकांसाठी मिळालेलं मार्गदर्शन मोलाचं ठरतंय.
यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)चे ज्युरी चेअरपर्सन म्हणून प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर आहेत. नुकतंच त्यांनीही रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.
या प्रतिष्ठित ज्युरी पॅनेलमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत सिंगापूरचे चित्रपट निर्माते अँथनी चेन, ब्रिटिश निर्माती एलिझाबेथ कार्लसेन, प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट दिग्दर्शक जिल बिलकॉक, आणि स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्जिया यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, NFDC आणि ESG च्या सहकार्याने, २० ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान गोव्यात ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)आयोजित करण्यात येणार आहे.