(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
तामिळनाडू सरकारने बुधवारी कला आणि संस्कृतीतील योगदानासाठी भारतीयार, एमएस सुब्बुलक्ष्मी आणि कलईमामणी पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार २०२१, २०२२ आणि २०२३ या वर्षांसाठी कलाकारांना दिले जातील. गायक केजे येसुदास यांना संगीतातील योगदानासाठी एमएस सुब्बुलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी यांनी कलैमामणी पुरस्कार जिंकला आहे.
अक्षय कुमारचा ‘Jolly LLB 3’ १०० कोटींपासून इतका दूर, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
साई पल्लवी आणि एसजे सूर्या यांना कलईमामणी पुरस्कार प्रदान करण्यात आले
अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता एसजे सूर्या, दिग्दर्शक लिंगुसामी, सेट डिझायनर एम जयकुमार आणि स्टंट कोरिओग्राफर सुपर सुब्बारयन यांना २०२१ च्या कलईमामणी पुरस्काराचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले. टेलिव्हिजन अभिनेता पीके कमलेश यांनाही हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विक्रम प्रभूसह या कलाकारांना २०२२ चा हा सन्मान मिळाला
२०२२ सालसाठी, अभिनेते विक्रम प्रभू, जया व्हीसी गुहनाथन, गीतकार विवेका, जनसंपर्क अधिकारी डायमंड बाबू आणि स्थिर छायाचित्रकार लक्ष्मीकांतन यांना कलईमामणी पुरस्काराचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कलांमधील योगदानासाठी टेलिव्हिजन अभिनेत्री मेट्टी ओली गायत्री यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बादशाह झाला जखमी, डोळ्यावर दिसली बांधलेली पट्टी; फोटो पाहून चाहते चकीत
संगीतकार अनिरुद्ध यांनाही कलामामणी पुरस्कार प्रदान
२०२३ सालसाठी, अभिनेते मणिकंदन, जॉर्ज मेरियन, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, गायिका श्वेता मोहन, नृत्यदिग्दर्शक सँडी उर्फ संतोषकुमार, जनसंपर्क अधिकारी निक्किल मुरुकन यांनाही कलईमामणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. टेलिव्हिजन कलाकार एनपी उमाशंकर बाबू आणि अजगन थमिझमणी यांनाही कलईमामणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ऑक्टोबरमध्ये प्रदान केले जाणारे पुरस्कार
हे पुरस्कार तामिळनाडू सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या तामिळनाडू इयाल इसाई नाटक मंद्रम या संस्थेकडून प्रदान केले जातात. आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते ते प्रदान केले जाणार आहेत. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक विजेत्या कलाकाराला तीन सुवर्णपदके आणि एक प्रमाणपत्र मिळणार आहे.