(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. आमिर खान, विद्या बालन, जावेद अख्तर-शबाना आझमी आणि शाहरुख खान यांच्याव्यतिरिक्त, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या उपस्थितीने लग्नात ग्लॅमर वाढवला. आशुतोष गोवारीकर यांचा मुलागा कोणार्क गोवारीकर हा लग्न बंधनात अडकला आहे. त्यांचे लग्नाचे व्हिडीओ, फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या लग्नाला बॉलिवूड किंग शाहरुख खानची देखील हजेरी लागली आहे. या लग्नातल्या अभिनेत्याच्या लूकने चाहत्यांना वेडे केले आहे.
Chhaava : अखेर ‘पुष्पा २’ला मागे टाकून ‘छावा’ने केला नवा रेकॉर्ड, जाणून घ्या सोमवारचे कलेक्शन!
काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये चमकणारा किंग खान
लग्नात काळ्या रंगाच्या टक्सिडो सूटमध्ये शाहरुख खान खूपच देखणा दिसत होता. यावेळी किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि सुरक्षा कर्मचारीही त्याच्यासोबत दिसले. नेहमीप्रमाणे, या सुपरस्टारने आपल्या उपस्थितीने उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले, हे वेगळे सांगायला नको. यावेळी आशुतोष गोवारीकर यांनी शाहरुख खानला मिठी मारून स्वागत केले. आणि आता अभिनेत्याचा लग्नातील हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
NEW:-
SRK in Ashutosh Gwarikar Son Marriage
Dashing As Always#ShahRukhKhan pic.twitter.com/221TXDfs1K— SRKian Faizy ( FAN ) (@SrkianFaizy9955) March 3, 2025
शाहरुख खान आणि आशुतोष यांचे जुने नाते
आशुतोष गोवारीकर आणि शाहरुख खान यांचे नाते खूप जुने आहे. दोघांनी २००४ मध्ये आलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटात एकत्र काम केले होते, जो एक कल्ट इंडियन चित्रपट म्हणून ओळखला जातो. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली. दरम्यान, लग्न आणि लग्नापूर्वीच्या समारंभातील अनेक क्षण व्हायरल होत आहेत. तसेच ‘लगान’ चित्रपटाचे निर्माते आशुतोष गोवारीकर स्टेजवर आले आणि त्यांनी त्यांच्याच चित्रपटातील चार्टबस्टर ट्रॅक ओ मितवावर नृत्य केले हा देखील व्हिडीओ आता चर्चेत आहे.
मुलाचे लग्न कधी झाले?
आशुतोष गोवारीकर आणि निर्माती सुनीता गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर २ मार्च रोजी विवाह बंधनात अडकला. त्याने कनकिया बिल्डर्सच्या रासेश बाबूभाई कनकिया यांची मुलगी नियती कनकियाशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी पारंपारिक हळदी समारंभाने झाली. त्यानंतर १ मार्च रोजी संगीताचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
मिका सिंगची शाहरुख विरोधात तक्रार, मागितलेली भेटवस्तू न दिल्याने नाराज
स्वागत समारंभही खूप खास होता
लग्नानंतर, जोडप्याच्या कुटुंबियांनी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले. हा एक भव्य कार्यक्रम होता ज्यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, अभिषेक बच्चन, जया बच्चन, अनुपम खेर, चंकी पांडे, सोनाली बेंद्रे, पूजा हेगडे, रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख, साजिद खान यांच्यासह अनेक स्टार्स उपस्थित होते.