Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahid Kapoor: ‘ढेंन टें णा’ गाण्यावर चाहत्यांसह थिरकाला शाहिद कपूर; सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ!

शाहिद कपूर लवकरच रोशन अँड्र्यूजच्या ॲक्शन ड्रामा 'देवा' या चित्रपटात पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आता अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 03, 2025 | 12:55 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता शाहिद कपूर अभिनेत्यासह उत्कृष्ट डान्सर देखील आहे हे तर सगळ्यांचं माहित आहे. परंतु अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या आगामी देवा चित्रपटाच्या सेटवर २००९ च्या कमिने चित्रपटातील ‘धन ते नान’ या त्याच्या लोकप्रिय गाण्यावर काही अप्रतिम डान्स मूव्हद्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. शाहिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. याचदरम्यान अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘देवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Reddit वर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर ‘देवा’ चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे. पांढरा शर्ट आणि खाकी पँट घातलेला तो चित्रपटात त्याच्या पोलिस अवतारात दिसत आहे आणि तो बंदूक घेऊनही व्हिडीओमध्ये दिसला आहे. यावेळी शाहिदने सेटवर उपस्थित चाहत्यांना फ्लाइंग किस्सही दिली. याचदरम्यान अभिनेता पब्लिक डिमांडने त्याच्या २००९ मधील कमिने चित्रपटातील ‘धन ते नान’ गाण्यावर थिरकताना दिसला आहे. देवाच्या सेटवर शाहीहने ‘धन ते नान’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आणि त्यासोबत गाणेही गायले. यावेळी शाहिदच्या डान्स मूव्ह्स पाहून उपस्थित चाहते वेडे झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता जबरदस्त व्हायरल झाला आहे.

 

Reddit वर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, “मला वाटते की तो त्याच्या सुपरस्टारच्या काळात राहावा,” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “मला त्या काळात परत आणा जेव्हा प्रत्येक कोपऱ्यात धन ते नान वाजत होते.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “खूप अद्भुत.” असे लिहून चाहत्यांनी भरभरून या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘कमिने’मध्ये शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा आणि अमोल गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऑगस्ट २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. चित्रपटाची गाणी प्रचंड हिट होती, विशेषत: ‘धन ते नान’ जी अनेक प्लॅटफॉर्मवर चार्टबस्टर गाण्याच्या यादीत शीर्षस्थानी होते.

Kumar Vishwas: सैफ-करिनाच्या मुलाचे नाव घेऊन का संतापले कुमार विश्वास? सोशल मीडियावर सुरु झाली चर्चा!

दरम्यान, नवीन वर्ष २०२५ रोजी, शाहिद कपूरने चाहत्यांना ‘देवा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर दाखवले, जे पूर्णपणे वेगळे आणि विलक्षण होते. सिगारेट ओढताना शाहिद खूपच पॉवरफुल लुक या पोस्टरमध्ये दिसत होता. देवाच्या पोस्टरवर ९० च्या दशकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रतिमा देखील दिसली आहे. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स द्वारे समर्थित आहे, ‘देवा’ हा चित्रपट एक हार्ड-कोर ॲक्शन एंटरटेनर आहे. शाहिद एका तल्लख पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर पूजा हेगडे त्याच्यासोबत पत्रकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात कुब्बरा सैत आणि पावेल गुलाटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित, ‘देवा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२४ रोजी रिलीज होणार होता, परंतु चाहत्यांच्या आनंदासाठी, तो आता ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

Web Title: Shahid kapoor dances on kaminey song dhan te nan on sets of deva fans go gaga over him video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • entertainment
  • Shahid Kapoor

संबंधित बातम्या

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
1

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…
2

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

BO Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची ‘कांतारा चॅप्टर १’ समोर नाही चालली जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
3

BO Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ ची ‘कांतारा चॅप्टर १’ समोर नाही चालली जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
4

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.