Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Ayushman Khurrana: आयुष्मान खुरानाने सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदाच छठ पूजा अनुभवली. ‘बुलाए छठी मां’ गाण्याशी जोडलेल्या खास आठवणी सांगितल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 13, 2026 | 02:28 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ayushman Khurrana:  बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटात आयुष्मानसोबत अभिनेत्री शर्वरी झळकणार आहे. विशेष म्हणजे, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील ‘बुलाए छठी मां’ हे खास गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातून छठ पूजेची श्रद्धा, भक्ती आणि परंपरा सुंदरपणे मांडण्यात आली आहे. या गाण्याच्या निमित्ताने आयुष्मान खुराना याने पहिल्यांदाच छठ पूजा अनुभवण्याचा आपला खास अनुभव सांगितला आहे.

पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजेची परंपरा

पंजाबी कुटुंबातून आलेल्या आयुष्मानने यापूर्वी कधीही छठ पूजा साजरी केली नव्हती. मात्र, ‘ये प्रेम मोल लिया’च्या शूटिंगदरम्यान त्याला या सणाचा भाग होण्याची संधी मिळाली. छठ पूजेशी जोडलेल्या भावना, श्रद्धा आणि परंपरा जवळून अनुभवता आल्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी विशेष ठरला.

याबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, “पंजाबी असल्यामुळे मी यापूर्वी कधीही छठ पूजा साजरी केली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदाच हा सण अनुभवणं माझ्यासाठी खूप खास होतं. छठशी जोडलेल्या भावना आणि त्याचं महत्त्व, तसेच हा सण किती सुंदरपणे लोकांना एकत्र आणतो, ही गोष्ट माझ्या मनाला विशेष भावली. प्रत्येक विधीमागे एक वेगळा अर्थ आहे आणि त्यामागे खूप श्रद्धा व भक्ती आहे. माझ्यासाठी हा अनुभव केवळ एका गाण्याच्या शूटिंगपुरता मर्यादित नव्हता, तर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असलेल्या एका सुंदर परंपरेचा भाग होण्याची संधी होती.”

शूटिंगदरम्यानचा तो भावूक क्षण आजही लक्षात

छठ पूजेच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सच्या शूटिंगपूर्वी घडलेला एक खास प्रसंगही आयुष्मानने सांगितला. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी संपूर्ण कलाकारांना एकत्र बोलावून छठ पूजेचं गाणं लावलं होतं. या प्रसंगाने संपूर्ण कलाकार मंडळी भावूक झाली होती.

या आठवणीबद्दल आयुष्मान म्हणाला, “छठ पूजेच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सच्या शूटिंगपूर्वी एक अतिशय खास क्षण अनुभवायला मिळाला. सूरजजींनी संपूर्ण कास्टला एकत्र बोलावलं आणि आमच्यासाठी छठ पूजेचं गाणं लावलं. तो क्षण इतका भावूक करणारा होता की प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. तो अनुभव आम्हा सर्वांच्या मनात कायमचा राहिला आणि त्यामुळे हा सीक्वेन्स आणखी अर्थपूर्ण झाला. छठ पूजेचा सीक्वेन्स साकारताना सूरजजींनी घेतलेली भूमिका आणि या परंपरा व त्यामागील भावना अत्यंत वास्तववादी पद्धतीने मांडण्याला त्यांनी दिलेलं महत्त्व यामुळे संपूर्ण कास्ट भारावून गेली होती.”

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची ८ दिवसांत १००० कोटींची कमाई, रणबीर कपूरच्या नावावर नवा विक्रम

‘बुलाए छठी मां’ गाण्यातून छठ पूजेचा भक्तिमय उत्सव

छठ पूजा हा भारतातील अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. याशिवाय दिल्ली, मुंबई, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह देशातील विविध भागांमध्येही भाविक मोठ्या उत्साहाने छठ पूजा साजरी करतात. श्रद्धा, कृतज्ञता आणि एकजुटीचा संदेश देणारा हा सण ‘बुलाए छठी मां’ या गाण्यातून सुंदरपणे उलगडण्यात आला आहे.

दरम्यान, ‘ये प्रेम मोल लिया’च्या माध्यमातून आयुष्मान खुराना पहिल्यांदाच सूरज बडजात्या यांच्या चित्रपटविश्वात प्रवेश करत आहे. कौटुंबिक नाती, सण आणि भारतीय परंपरा यांना आपल्या चित्रपटांमधून विशेष स्थान देणारे सूरज बडजात्या यावेळीही प्रेक्षकांसाठी एक भावनिक आणि सांस्कृतिक अनुभव घेऊन येत आहेत. त्यामुळे आयुष्मान आणि शर्वरीची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Nikita Dutta Birthday: बॉलिवूड ते मराठी चित्रपटसृष्टी! निकिता दत्ताने गाजवली अभिनयाची दुनिया, ३३ व्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी

Web Title: Ayushmann khurrana first chhath puja experience yeh prem mol liya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Ayushman Khurrana
  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
1

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची ८ दिवसांत १००० कोटींची कमाई, रणबीर कपूरच्या नावावर नवा विक्रम
2

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची ८ दिवसांत १००० कोटींची कमाई, रणबीर कपूरच्या नावावर नवा विक्रम

Nikita Dutta Birthday: बॉलिवूड ते मराठी चित्रपटसृष्टी! निकिता दत्ताने गाजवली अभिनयाची दुनिया, ३३ व्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी
3

Nikita Dutta Birthday: बॉलिवूड ते मराठी चित्रपटसृष्टी! निकिता दत्ताने गाजवली अभिनयाची दुनिया, ३३ व्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी

Juhi Chawla Birthday: IAS बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून निवडला अभिनयाचा मार्ग; आज भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळख!
4

Juhi Chawla Birthday: IAS बनण्याचं स्वप्न अर्धवट सोडून निवडला अभिनयाचा मार्ग; आज भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळख!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.