(फोटो सौजन्य - x अकाउंट)
विनोदी कलाकार समय रैना आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांनी अलीकडेच केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये दोघांनीही पालकांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या, त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेचा विषय बनले. या वादावर अनेक राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती प्रतिक्रिया देत आहेत. आता शेखर सुमन यांनीही या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. शेखर सुमन अभिनेत्याने या प्रकरणावर आपले मत मांडले आहे.
शेखर सुमन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली
इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना शेखर सुमन यांनी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, ‘अशी वेळ आली आहे की लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी बोलू लागले आहेत. पालकांबद्दल अशा घाणेरड्या आणि अश्लील गोष्टी बोलल्या जात आहेत, ज्यामुळे समाज पूर्णपणे अस्वस्थ झाला आहे. अशा लोकांना देशाबाहेर हाकलून लावले पाहिजे आणि ते कधीही परत येऊ नयेत.” शेखर सुमन म्हणाले की, ‘ही परिस्थिती खूप दुःखद आहे, जिथे लोकांनी रोस्ट कॉमेडीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.’ असे त्यांनी सांगितले आहे.
Chhaava: ‘छावा’ने तिसऱ्या रविवारी देखील केला धमाका; या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून रचला इतिहास!
शेखर सुमन यांनी सरकारला आवाहन केले
याशिवाय शेखर सुमन यांनी सरकारला अशा शो आणि कंटेंटवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिवीगाळ आणि अश्लीलतेने भरलेले शो करा, ज्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ होईल.’ सरकारने या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी आणि अशा शोवर कायमची बंदी घालावी. “या लोकांना रंगून सारख्या दूर कुठेतरी पाठवायला हवे!’ असे वक्तव्य शेखर सुमन यांनी समाजात घडणाऱ्या अश्लील टिप्पण्यांबद्दल चिंता व्यक्त करत केले, ज्या टीव्ही चॅनेल्सवर उघडपणे प्रसारित केल्या जात आहेत.
संपूर्ण वाद काय होता?
जानेवारी २०२५ मध्ये ‘बीअरबायसेप्स’ या त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी प्रसिद्ध असलेला रणवीर अलाहाबादिया ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एक प्रश्न विचारताना दिसला तेव्हा हा वाद सुरू झाला. हा प्रश्न पालकांच्या नातेसंबंधात होता त्यावेळी हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याबद्दल बराच संताप पसरला. लोकांनी ते अत्यंत अश्लील आणि असंवेदनशील मानून टीका करायला सुरुवात केली. नंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि व्हिडिओ YouTube वरून काढून टाकला.
स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आज गाजवतेय बॉलिवूड इंडस्ट्री
समय रैना आणि रणवीरवर टीका?
समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या या विधानामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अनेक लोक याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केलेली घाणेरडी टिप्पणी मानत आहेत. यानंतर, या वादाबद्दल सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया आल्या, त्यापैकी बहुतेकांनी या प्रश्नाला अपमानास्पद आणि असंवेदनशील म्हटले. यासंबंधीच्या टिप्पण्यांमधून हे सिद्ध झाले की समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीचा संदेश दिला जात आहे, जो भविष्यात समाजात आणखी फूट पाडू शकतो.