Shraddha Kapoor Birthday
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. अनेकजणं ऑडिशन्स देतात तर कोणी पार्टटाइम नोकरी करत चित्रपटांमध्ये येण्याचं स्वप्न पाहतात. मात्र बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जी स्टारकीड असूनही चक्क कॉफी शॉपमध्ये काम करायची. पण ती हे काम महिन्याच्या खर्चासाठी करायची. कॉफी शॉपमध्ये काम करत प्रसिद्धीझोतात आलेल्या ह्या अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे, जाणून घेऊया…
Indrayani : ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, मोठ्या इंदूला पाहिलंत का?
बॉलिवूडची ‘खुबसुरत गर्ल’ म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे. स्त्री २ च्या घवघवीत यशामुळे अभिनेत्रीला सध्या इंडस्ट्रीमध्ये ‘ब्लॉकबस्टर स्त्री’ म्हणून ओळख आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक आणि विनोदी अभिनेते शक्ती कपूर यांची लेक असलेल्या श्रद्धाने २०१० साली रिलीज झालेल्या ‘तीन पत्ती’ चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारून तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. पण आज तिने इंडस्ट्रीत स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे. परंतु तिचा तो पहिला चित्रपट फारसा चालला नाही.
बॉलिवूडची ही ‘ब्लॉकबस्टर स्त्री’ डाउन टू अर्थ आहे. आज यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत जरीही श्रद्धाचा समावेश होत असला तरीही, अभिनय जगतात येण्यापूर्वी ती एका कॉफी शॉपमध्ये काम करायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने बोस्टनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यावेळी अभिनेत्रीने एका कॉफी शॉपमध्ये काम केले. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याचा खुलासा केला होता. आज भलेही श्रद्धा कपूर इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु एक काळ असा होता की तिला चित्रपटांत काम करण्याची इच्छा नव्हती. शाळेत शिकत असताना सलमान खानच्या चित्रपटात श्रद्धाला काम करण्याची संधी मिळत होती, तेव्हा ती १६ वर्षांची होती. परंतू तिने ती संधी नाकारली. आज बॉलिवूडमध्ये येऊन श्रद्धाला १२ वर्षे झाली आहेत.
अभिनयाच्या बाबतीत श्रद्धा तिच्या वडिलांच्या म्हणजे शक्ती कपूर यांच्याही पुढं आहे. २०१५ मध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० च्या यादीमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश झाला होता. या यादीत तिला ५७ वं स्थान मिळालं होतं. याशिवाय ‘फोर्ब्स ३० अंडर ३० एशिया’च्या यादीतही तिचा समावेश झाला होता. श्रद्धा कपूर जेव्हा १६ वर्षांची असताना तिला ‘लकी नो टाइम फॉर लव’ या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विचारणा झाली होती. परंतु त्यावेळी ती शाळेत होती आणि तिला सायकॉलॉजिस्ट व्हायचे असल्यानं तिनं सलमान खानचा हा सिनेमात काम करण्याची संधी नाकारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती सुमारे ५७ कोटी रुपयांहून अधिक आहे. ती एका चित्रपटासाठी सुमारे सहा कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय जाहिराती आणि सोशल मीडियावरील पोस्टमधूनही ती लाखो रुपये कमावते.
दीपिका कक्करने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मधून घेतली एक्झिट, सोशल मीडियावर ट्रोल होण्यामागील कारण काय ?
इंग्रजी आणि हिंदी शिवाय रशियन आणि ब्रिटीश भाषांचे तिचे उच्चारण देखील उत्तम आहे. श्रद्धानं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसंच सिनेमांतूनही तिनं कोट्यवधी रुपये कमावले आहेत. याशिवाय तिचा स्वतःचा ‘लेबल इमारा’ हा फॅशन ब्रँड देखील आहे. सध्या श्रद्धा कपूरचं नाव प्रसिद्ध पचकथा लेखक राहुल मोदीसोबत जोडलं जात आहे. त्यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. या दोघांनाही अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. आता पुन्हा एकदा दोघेही एका लग्न समारंभात एकत्र दिसले. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र पोज देताना दिसले होते. दोघेही स्टेजवर वधू-वरांसोबत पोज देताना दिसले.