(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. आता चित्रपटाचे एक नवीन पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये एका नवीन अभिनेत्रीची चित्रपटात एन्ट्री झाली आहे. ती नवीन अभिनेत्री कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
Bigg Boss 19 : तानिया मित्तलने लावली आग! कुनिका – गौरवमध्ये कडाक्याच भांडण सुरु, पहा Video
शिल्पा शिरोडकर चित्रपटामध्ये करणार एन्ट्री
निर्मात्यांनी ‘जटाधारा’ चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा लूक रिलीज केला आहे. चित्रपटात शिल्पाचे स्वागत करताना निर्मात्यांनी तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहितीही दिली आहे. शिल्पा चित्रपटात शोभा नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की ‘ती केवळ लोभाने प्रेरित नाही तर ती त्याला परिभाषित करणारी आहे.’
She isn’t just driven by greed, she defines it. Presenting @shilpashirodkr as Shobha.#UmeshKrBansal #PrernaArora @zeestudiossouth @isudheerbabu @sonakshisinha @shivin7 #ArunaAgarwal #ShilpaSinghal @DeshmukhPragati @girishjohar @kejriwalakshay @IamDivyaVijay @bhavinigoswami_… pic.twitter.com/LRfqT84bR1
— Zee Studios (@ZeeStudios_) August 28, 2025
शिल्पा धोकादायक लूकमध्ये दिसली
निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये शिल्पा हवनकुंडात जळत्या अग्नीजवळ काळी साडी घालून बसलेली दिसत आहे. यादरम्यान ती जीभ बाहेर काढून अग्नीकडे ओरडत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक सांगाड्यांच्या कवट्या देखील दिसत आहेत. तसेच, मागे अनेक दिवे जळत आहेत. तिचा लूक पाहून असे वाटते की ती काही तंत्र किंवा पूजा वगैरे करताना चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच अभिनेत्रीचा हा खतरनाक लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
‘आंटी किसिको बोला’ हा अनोखा शो घेऊन आली फराह खान; सुनीता अहुजा देखील करणार धमाका
‘जटधारा’ हा एक पौराणिक थ्रिलर चित्रपट
‘जटधारा’ हा चित्रपट एक पौराणिक थ्रिलर आहे, ज्यामध्ये भारतीय पौराणिक कथांना रोमांचक दृश्ये आणि गडद कल्पनारम्यतेसह एकत्र केले गेले आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमध्ये त्रिशूळ, गडगडणारे ढग, भगवान शिवाचे भक्त आणि सोनाक्षी सिन्हाचे भयंकर रूप दाखवले आहे, ज्यामुळे कथा अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनते. झी स्टुडिओ आणि प्रेरणा अरोरा निर्मित, वेंकट कल्याण आणि अभिषेक जयस्वाल दिग्दर्शित, या चित्रपटात उत्तम VFX असू शकतात. ‘जटधारा’ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.