फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बिग बॉस 19 मध्ये सुरू होण्याच्या दोन महिन्याच्या आधीपासूनच चर्चेचे नाव म्हणजेच गौरव खन्ना. आता बिग बॉस सुरू होऊन तीन ते चार दिवस झाले आहेत आणि सध्या बिग बॉस 19 मध्ये गौरव खन्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणखी एक प्रोमो समोर आला आहे. अनेक मागील सीजन मधील स्पर्धकांशी गौरव खन्नाची तुलना केली जात आहे. जियोहॉटस्टारने त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रमोद शहर केला आहे यामध्ये कुणीका सुदानंद आणि गौरव खन्ना हे दोघेही भांडताना दिसत आहेत.
जिओहॉटस्टारने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस 19 चर्चित सदस्य तानिया मित्तल हिने गौरव खन्ना आणि कुनिका सदानंद यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम केले आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच तानिया मित्तल म्हणते की मला असे वाटते की तुमच्या दोघांमध्ये चांगले नातं आहे. यावर कुणीका म्हणते की अशी तुझी चुकीची समज आहे. मला या आधी देखील असे म्हटले होते. यावर गौरव खन्ना म्हणतो ती तुमच्या डोक्यामध्ये विष टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यावर कुणीका रागात गौरवला म्हणते की काहीही करत असो.
यावर गौरव खन्ना आणि कुनिका सदानंद या दोघांमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळतो. बिग बॉस १९ ची थीम लोकशाहीभोवती आधारित होती. या थीमवरून हे स्पष्ट होते की यावेळी घरातील सदस्य त्यांच्या परस्पर समजुतीने आणि संमतीने घर चालवतील. ते स्वतःला नामांकित करतील आणि स्वतः कोणाला तरी कॅप्टन म्हणून निवडतील. बिग बॉस सुरू होऊन ३ दिवस झाले आहेत. पण कॅप्टन म्हणून कोणालाही निवडण्यात आले नाही. पण द खबरीच्या ट्विटनुसार, बिग बॉसला आता या सीझनचा पहिला कॅप्टन मिळाला आहे. माहितीनुसार, कुनिका सदानंद ही पहिली लीडर म्हणून दिसणार आहे.
@TANYAMITTAL_ ne chaaha @Kunickaa ko bhadkaana, kya ghar mein ho jaayega naya hungama? 😲
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par. pic.twitter.com/Id5ou9n3NI
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 28, 2025
बिग बॉसच्या घरात जेवणाबद्दल रोज वादविवाद होतात. कधी कोणी जास्त जेवतो तर कधी कोणाला काही मिळत नाही. अलिकडेच झीशानने शेंगदाणे खाल्ले ज्यामुळे गौरव आणि त्याच्यात वाद झाला. अमानने झीशानला पाठिंबा दिला आणि त्याला सांगितले की तो चुकीचा नाही आणि जेव्हा सर्वजण जेवतात तेव्हा भांडण होऊ नये. झीशानने गौरवच्या घरातल्या मैत्रीवर टीका केली आणि म्हटले की गौरवला त्याच्या मागे दोन-चार लोक फिरण्याची सवय आहे.